मेथीची भाजी, पराठे विसरा; एकदा खाऊन बघा ‘चमन मेथी मलाई’ 

टीम ई सकाळ
Tuesday, 9 February 2021

ही भाजी खाल्यानंतर तुम्हीही मेथीच्या प्रेमात पडाल आणि कोणत्याही पार्टीमध्ये ही भाजी आहे का बघणार... चला तर जाणून घेऊ या ही भाजी तयार करण्याची पद्धत...

नागपूर : मेथी आरोग्यासाठी मोठी लाभदाई आहे. हिवाळ्यात मेथीचे सेवन केल्यास मोठे फायदे होतात. यामुळे याला मोठी मागणी असते. मेथीची भाजी, पराटे याला अनेकांची पसंती असते. यावर खवय्ये तुटून पडतात. दुसरीकडे अनेकांना मेथी खायला अजीबात आवडत नाही. मात्र, आम्ही घेऊन आलो आहे ‘चमन मेथी मलाई’ भाजी. ही भाजी खाल्यानंतर तुम्हीही मेथीच्या प्रेमात पडाल आणि कोणत्याही पार्टीमध्ये ही भाजी आहे का बघणार... चला तर जाणून घेऊ या ही भाजी तयार करण्याची पद्धत...

भारतीय लोकांना चविष्ठ खायला खूप आवडते. त्यांना नानाविध प्रकारची भाजी खायची सवय असते. तसेही भारतात चाट खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील रस्स्याची भाजी (ग्रेव्ही डिश) मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. ग्रेव्ही डिश उत्तर भारतात प्रसिद्ध आहे, असे म्हटले जाते. मात्र, याचा चाहता वर्ग आता विदर्भातही मोठ्या प्रमाणात आहे.

हेही वाचा -  चला, शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करूया; शेतकरी आंदोलनाचे नेते अमर हबीब यांचं आवाहन 

‘चमन मेथी मलाई’ ही भाजी उत्तर भारताची आहे. काजू, मलाई, चीज आणि मसाल्यांचा वापर करून ही भाजी तयार केली जाते. ही स्वादिष्ट भाजी बनवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणार नाही. काही मिनिटांतच ‘चमन मेथी मलाई’ भाजी तयार करता येते. पनीर बटर मसाला आणि पालक पनीर सारखी ही भाजी आहे. जी कोणत्याही पार्टीमध्ये जेवणाचे सौंदर्य वाढवेल. ही भाजी खाल्यावर कोणीही याची चव विसरणार नाही, हे मात्र नक्की...

हिवाळ्यात हिरव्या भाजीपाल्यांना मोठी मागणी

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हिरव्या भाजीपाल्यांना मोठी मागणी असते. मेथी, पालक, शेंग्या अशा एक ना अनेक भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी असतात. यात मेथी आणि पालक या भाज्यांना नागरिकांकडून पसंती दिली जाते. मेथीचा उपयोग भाजीशिवाय अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. ‘चमन मेथी मलाई’ याच्या विषयी अनेकांना माहिती नाही.

ही लागते सामग्री

‘चमन मेथी मलाई’ डिश तयार करण्याची ५० ग्रॅम काजू, ५० ग्रॅम मॅगझ (कस्तुरीचे बियाणे), २ कांदे, हिरव्या मिरच्या, १० ग्रॅम आले, १० ग्रॅम लसूण, दोन चमचा कसुरी मेथी कोरडी, शंभर मिली (मिली) मलाई, दोनशे ग्रॅम पनीर, तीस ग्रॅम बटर, चवीनुसार मीठ, एक टीस्पून साखर, चिमूटभर हळद, चिमूटभर वेलची पूड, चिमूटभर पांढरा तिखट घ्या.

हेही वाचा - तंदुरी चिकन सोडा ओ.. कधी तंदुरी वडापाववर ताव मारलाय का?

अशी तयार करा ‘चमन मेथी मलाई’

एका गंजात काजू आणि चिरलेली कांदे पंधरा मिनिटांपर्यंत उकळून घ्या. उकळल्यानंतर त्याचे पेस्ट तयार करा. यानंतर लोणीमध्ये हा पेस्ट सुगंध येईपर्यंत तळून घ्या. यांनत त्यात कसुरी मेथीची पाने टाकून एक मिनिट परतून घ्या. यानंतर त्यात हिरवी मिरची टाका. हे झाल्यानंतर काजूची पेस्ट टाकून दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत शिजू द्या. यानंतर आपल्या आवडीनुसार दूध किंवा पाणी टाका. तसेच मीठ, मलाई घालून आणखी दोन मिनिट शिजवा. या भाजीला हिरवी मिरची आणि आल्यासोबत शिजू द्या. भाजी तयार झाल्यानंतर बटर नानबरोबर खायला द्या.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know the reciepe of Chaman Methi Malai Nagpur News