

paneer and Veggie kebabs Recipe:
Sakal
सकाळच्या नाश्त्यासाठी पनीर अँड व्हेजी कबाब एक उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असून, गाजर, बीन्स आणि मटार यांसारख्या भाज्यांचे मिश्रण कबाबला चवदार बनवते. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी व्यस्त सकाळी पौष्टिक नाश्ता देण्यास मदत करते.
Easy paneer and vegetable kebab recipe for breakfast: सकाळचा नाश्ता हा दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि चवीने करणारा असला पाहिजे. जर तुम्ही नेहमीचे पोहे, उपमा खाउन कंटाळला असला काहीतरी नवीन आणि चविष्ट ट्राय करू इच्छित असाल, तर पनीर अँड व्हेजी कबाब ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी सकाळच्या नाश्त्याला खास बनवते. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि कमी वेळात तयार होते, ज्यामुळे व्यस्त सकाळीही तुम्ही पौष्टिक नाश्ता बनवू शकता. चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह केल्यास त्याची चव आणखी वाढते. पनीर अँड व्हेजी कबाब बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.