Diwali 2022 : या पद्धतीने करा खमंग खुसखूशीत चकली; पहा रेसिपी

Diwali 2022
Diwali 2022 esakal

पुणे : पाहुण्यांकडे गेल्यावर भरलेल्या फराळाच्या ताटातली केवळ चकली शोधणारे आणि चवीने खाणारे चकलीचे अनेक चाहते आहेत. चकली करायची म्हणजे पीठ मळले आणि चकली केली असे नाही. त्यासाठी काही दिवस आधी तयारी करावी लागते.चकलीला चकुली, चकरी, मुरुक्कू अशी नावे आहेत. चकली दक्षिण भारतातून आपल्याकडे आली. ही खमंग खुसखूशीत चकली कशी बनवायची ते पाहुयात.

Diwali 2022
Diwali 2022 : या दिशेपासून सुरु करा दिवाळीची साफ-सफाई; लक्ष्मी-कुबेराचा लाभेल आशिर्वाद

साहीत्य

एक किलो तांदूळ, अर्धा किलो हरभरा डाळ, पाव किलो उडीद डाळ, ५० ग्रॅम धणे, ५०ग्रॅम जिरे, चवीपुरते मीठ, तेल

कृती

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून कपड्यावर वाळत घाला. हरभरा डाळ आणि उडीददेखील वेगवेगळे धुवा आणि कपड्यावर वाळवून घ्या. एक दिवस वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी कढईमध्ये हे तिन्ही वेगवेगळे यामध्ये धने घालून भाजून घ्या. सर्व भाजून झाल्यावर त्यात जिरे मिसळा त्यानंतर त्याची भाजणी तयार करा.

भाजणी मध्ये तेल अथवा तुपाचे मोहन भिजवताना घाला. भाजणी भिजवताना गरम पाण्याचा वापर करावा. खूप घट्ट अथवा सैल मळू नये अन्यथा चकली कडकडीत होते. चकलीपात्रात मळलेले पीठ घालून नंतर व्यवस्थित त्या चकल्या पाडा आणि मग तळायला घ्या.

Diwali 2022
Bhaubeej Diwali 2022 : यंदा कधी आहे भाऊबीज?

तांदळाच्या पिठाच्या हटके चकल्या

साहित्य

दोन वाट्या तांदूळ पीठ, हिंग, धने – जिरे पावडर 1-1 चमचा,पाव वाटी लोणी, पांढरे तीळ, ओवा, चवीपुरते मीठ, लाल तिखट अर्धा चमचा.

कृती

तांदळाच्या पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्या. साध्या पाण्याने हे पीठ घट्ट भिजवा. चकल्या पाडा आणि तळा.

कुरकूरीत चकलीसाठी टिप्स

कुरकुरीत चकल्यांसाठी या टिप्स लक्षात ठेवा चकलीसाठी लागणारं पीठ थोडे वाफवून घेतले की चकली कुरकुरीत होते. साच्यामध्ये चकली बनवत असताना सारखी तुटत असेल तर पिठात थोडं पाणी आणि तेल घालून व्यवस्थित मळून घ्यावं. तसेच चकली काढल्यानंतर थंड झाल्यावरच डब्यात भरावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com