Diwali 2023: खमंग आणि कुरकुरीत मूग डाळीच्या चकल्या, जाणून घ्या रेसिपी

फराळातील सगळ्यात आवडता कोणता पदार्थ असेल तो म्हणजे चकली.
chakali
chakalisakal

दिवाळी म्हटली की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं ते म्हणजे फराळ. फराळातील सगळ्यात आवडता कोणता पदार्थ असेल तो म्हणजे चकली. हवामान बदलामुळे सध्या पावसाचं वातावरण असलं तरीही दिवाळसणाला खमंग, खुसखुशीत चकलीची आठवण सगळ्यांनाच येते. 

दिवाळीत आपण चकल्या करतोच. भाजणी जर परफेक्ट बनली नाही तर चकली तुटण्याची शक्यता असते किंवा चकली  तेलात व्यवस्थित फुलत नाही. पण जर तुम्हाला यावेळी अशी चकली बनवायला वेळ नसेल तर तुम्ही यावेळी मुगाच्या डाळीची चकली करू शकता.

chakali
Diwali Recipes 2023 : धनत्रयोदशी निमित्त घरीच बनवा सगळ्यांना आवडणारी काजूकतली, ही आहे सोपी रेसिपी

लागणारे साहित्य- 

दीड वाटी मुगाची डाळ, तीन वाट्या मैदा, पाव वाटी तांदळाचे पीठ, अर्धा चमचा हिंग, पाव वाटी तीळ, एक चमचा ओवा, अडीच चमचे लाल तिखट, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल

कृती- 

डाळीत हळद, हिंग व दुप्पट पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. त्याच कुकरमध्ये दुसऱ्या भांड्यात मैदा पुरचुंडीत बांधून कोरडाच वाफवायला ठेवा. तीन शिट्या झाल्यावर (डाळ शिजल्यावर) डाळ बाहेर काढून घोटून घ्या. त्यात मैदा व तांदळाचे पीठ चाळून मिसळा. इतर साहित्य घालून घट्ट मळा व लगेच चकल्या करा.

(संदर्भ: पुस्तक- दिवाळी फराळ, सकाळ प्रकाशन, लेखिका-जयश्री कुबेर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com