Diwali Faral history : दक्षिण भारतातील मुरुक्कू आपल्याकडे कशी ? पहा चकलीचा इतिहास
पुणे : दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आवडणाऱ्या लोकांची कमी नाही. यामुळेच दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ जवळजवळ प्रत्येक घरात खूप आवडतात. मसाला डोसा, इडली सांबार किंवा उत्तपम असो. दक्षिण भारतातील असाच एक पदार्थ आपल्या राज्यात आला. आता तो पदार्थ इतका लोकप्रिय झालाय की त्याशिवाय फराळाचे ताट अपूर्ण वाटते. तो पदार्थ म्हणजे मुरूक्कू अर्थात चकली.
केवळ दिवाळीलाच प्रत्येकाच्या घरात फराळाचे पदार्थ करतात. पण इतर राज्यात तो आधीपासूनच करतात. आपल्याकडे असलेली चकली दक्षिण भारतात मुरुक्कू म्हणून खाल्ली जाते. उपनिषद काळात चक्रिका अशा पदार्थाचा उल्लेख झालेला दिसतो. तमिळ भाषेत मुरुक्कू म्हणतात. या शब्दाचा अर्थ वेटोळे असा होतो. तामिळ नागरीकांचा हा आवडता पदार्थ आहे. तिकडे हा पदार्थ सायंकाळच्या स्नॅक्ससाठी केला जातो.
दक्षिण भारतातील लोक जगभरात जिथे गेले तिथे ते त्यांचे पदार्थ सोबत घेऊन गेले. त्यामुळे परदेशातही मुरूक्कू फेमस झाला आहे. म्यानमार, श्रीलंका, मलेशीया, सौदी या देशातही हा पदार्थ आवडीने खातात. महाराष्ट्रासह मुरूक्कू केरळ,आंध्र प्रदेश,कर्नाटक या राज्यातही केली जाते. कर्नाटकमध्ये चकुली, ओडिसामध्ये दंतकली,गुजरातमध्ये चकरी,तेलुगूमध्ये चक्राळू अशी नावे आहेत.
चकली भाजणीही वेगवेगळी
चकलीसाठी २ दिवसआधी तांदूळ, पीठ, डाळी एकत्र भिजवून ते भाजून दळून आणावे लागते. यासाठी आता तयार भाजणी पीठही मिळते. जन्मापासून चकली हा कुरकूरीत पदार्थ अनेकांचा फेव्हरेट आहे. विदर्भात इतर साहित्यासोबत ज्वारी, बाजरी, तुरडाळीचा वापर करतात. तर, मराठवाड्यात ओव्याचा वापर केला जातो. पश्चिम महाराष्ट्रात शेंगदाणे,तर काही ठिकाणी चणा डाळ, उडद डाळ जास्त प्रमाणात घालतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.