Diwali Faral history : पर्शियन शेखरबुरा अनेक वर्षापासून आपल्या फराळातही केला जातोय? पहा तो कोणता पदार्थ आहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Faral history : पर्शियन शेखरबुरा अनेक वर्षापासून आपल्या फराळातही केला जातोय? पहा तो कोणता पदार्थ आहे

Diwali Faral history : पर्शियन शेखरबुरा अनेक वर्षापासून आपल्या फराळातही केला जातोय? पहा तो कोणता पदार्थ आहे

पूणे : आपल्याकडे असलेल्या फराळाच्या पदार्थावरून एक विनोद प्रसिद्ध आहे. शंकरपाळीत भगवान शंकर असतात का? नाही मग त्याला नाव शंकरपाळी कसे, आता या प्रश्नाचे उत्तर माहीती नाही. पण, शंकरपाळीला असलेली विविध नावे आणि ती कुठून आली असावी याचे उत्तर आमच्याकडे आहे.

हेही वाचा: Diwali Faral history : हडप्पा संस्कृतीच्या काळातही लाडू बनवले जायचे

शंकरपाळीला विविध नावे आहेत. असं म्हणतात की त्याची निर्मिती पर्शियन गोड पदार्थ शेखरबुरापासून झाली आहे. शेखरबुरा रव्यापासून बनवला जातो. तर शंकरपाळीत रवा आणि मैदा एकत्र वापरतात. शंकरपाळीसार आकारही शेखरबुऱ्यासारखाच असतो. शेखरबुरा हा पदार्थ अफगाणिस्तान आणि टर्की या देशात प्रामुख्याने बनवला जातो.

हेही वाचा: Diwali Faral history : उत्तर प्रदेशातील गुजीयाला फराळात मानाचे स्थान; पहा करंजीचा प्रवास!

अफगाणिस्तानात बनवला असल्याने कदाचित उर्दूमधील खुरमा असेही नाव आहे.अफगाणिस्तानातमधून हा पदार्थ जसा भारतात आला तसा तो उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड या देशातही गेला.

हेही वाचा: Diwali Faral : फराळासाठी आणलेले तूप शुद्ध की भेसळयुक्त कसे ओळखाल ?

शंकरपाळीची विविध नावे

गुजराती भाषेत शकरपारा, कन्नड़मध्ये शंकरपोळी, उर्दूमध्ये शकरपारे, खुरमा, नेपालीमध्ये खुरमा, लकडी मिठाई, अशी बरीच नावे या आपल्या शंकरपाळीची आहेत.