Diwali Special Faral Recipe: दिवाळीच्या फराळात सगळ्यात आधी फस्त होणारा पदार्थ म्हणजे चकली. खमंग आणि चटपटीत चव हेच चकलीचे वैशिष्ट्य. म्हणून तर दिवाळी व्यतिरिक्त इतर वेळीही चकलीला विशेष मागणी असते..भाजणी करण्यासाठी लागणारे साहित्य4 वाट्या तांदूळ1 वाटी चणा डाळ1 वाटी उडीदडाळ1 वाटी मूगडाळअर्धी वाटी धणे पाव वाटी जिरे.कृती :- तांदूळ व डाळी धुवून निथळून कोरड्या करून घ्याव्यात.- मंद आचेवर सर्व धान्ये वेगवेगळी खमंग भाजून घ्यावीत.- धणे-जिरेसुद्धा भाजून घ्यावेत.- तांदूळ, सर्व डाळी, धणे-जिरे हे सर्व एकत्र करून दळून आणावे.(टीप ः काही जण भाजणीत एक वाटी जाड पोहेसुद्धा भाजून घालतात.).भाजणीची चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य 4 वाट्या भाजणीअर्धी वाटी तेल (किंवा लोणी)पाव वाटी तीळ1 चमचा ओवाअर्धा चमचा हिंगपूडचवीनुसार मीठतिखटथोडी हळदतळण्यासाठी रिफाईंड तेल.भाजणीची चकली बनवण्याची पद्धत पहिली - भाजणीच्या पिठात तेल कडकडीत करून घालावे.- नंतर त्यात सर्व जिन्नस घालून गरजेप्रमाणे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे.- तळणीसाठी तेल तापत ठेवून, थोडे थोडे पीठ पुन्हा मळून चकलीच्या सोऱ्यात घालून प्लॅस्टिकच्या कागदावर चकल्या पाडाव्यात.- तेल तापल्यावर आच मंद करून 3-4 चकल्या हलक्या हाताने उचलून हळूच तेलात सोडाव्यात.- चकलीची एक बाजू तळून झाली, की मग चकली उलटून दुसरी बाजू तळावी.- दोन्ही बाजूंनी तळून झाल्यावर चकल्या झाऱ्याला हलक्या लागतात. मग त्या काढून चाळणीत निथळत ठेवाव्यात.- दर वेळी सोऱ्यात घालताना पीठ पुन्हा मळून घ्यावे. चकल्या गार झाल्यावर डब्यात भराव्यात..भाजणीची चकली बनवण्याची पद्धत दुसरी - चार वाट्या भाजणीसाठी अंदाजे साडेतीन वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यात तेल घालावे.- भाजणीच्या पिठात तीळ, ओवा, तिखट, मीठ, हिंग, हळद सर्व मिसळून ते पीठ उकळत्या पाण्यात घालून ढवळावे व झाकण ठेवावे.- गॅस बंद करावा. जरा गार झाल्यावर तेलपाण्याचा हात लावून पीठ छान मळून घेऊन, चकल्या बनवून तळाव्यात..खमंग चकलीसाठी खास टिप्स1) भाजणीचा मुख्य घटक म्हणजे तांदूळ. भाजणीसाठी जाड तांदूळच घ्यावा, म्हणजे हवा तसा चिकटपणा मिळतो.2) भाजणी नीट खमंग भाजावी व दळून आणताना गिरणीत इतर पिठांची भेसळ होऊ नये याची काळजी घ्यावी.3) चकल्या करताना भाजणीचे पीठ फार घट्ट कालवले गेले, तर चकल्या हलक्या होत नाहीत व सैल झाले, तर चकल्या मऊ पडतात. याची दक्षता घ्यावी.4) तळताना तेल कमी तापलेले असेल, तर चकल्या विरघळण्याची शक्यता असते व अधिक तापले, तर चकल्या वरून काळपट व आतून मऊ राहतात. तेलाचे तापमान योग्य राहील याची काळजी घ्यावी.5) एक-दोन चकल्या तळून पाहाव्यात. चकली कडक वाटली, तर थोडे गरम तेल पिठात मिसळावे. विरघळत असली, तर थोडी भाजणी मिसळावी..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.