पावसाच्या कोसळधारा आणि गरम पिझ्झा म्हणजे Perfcet Combo; जाणून घ्या सोपी रेसिपी

पिझ्झा हे नाव ऐकताच आता लहानापासुन थोरांपर्यंत सगळयांच्या तोंडाला पाणी सुटतं.
pizza
pizzasakal

पिझ्झा हे नाव ऐकताच आता लहानापासुन थोरांपर्यंत सगळयांच्या तोंडाला पाणी सुटतं. बाहेर मस्त पाऊस पडतो अन् मग घरीच केलेला पिझ्झा खावा अशी इच्छा होते पण खुप जणांना पिझ्झाची रेसिपी माहिती नसते. त्यांच्यासाठीच आज ही शानदार पिझ्झा बनविण्याची रेसेपी. (pizza recipe)

pizza
घरकुल अपुले : पावसाळा आणि खादाडी

पिझ्झा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

1)गहु आटा

2)टमाटर

3)चीज

4)पिझ्झा बेससाठीची लागणाऱ्या गोष्टी - मैदा अडीच कप (व्यक्तीनुसार 1 कप प्रती व्यक्ती ),सुखा ईस्ट ( किन्वन )

तेल दिड चमचा ,मिठ चविनुसार, इटालियन मसाला अर्धा चमचा, कोमट पाणी एक कप,सूजी 2

5) पिझ्झा साॅस साठी आवश्यक साहित्य-एक बारीक चिरलेला,लसुण चवीनुसार,टमाटर 2 बारीक कापलेले

लाल मिरच्यांची चटणी अर्धा चमचा,साखर अर्धा चमचा

काळे मिरे पावडर अर्धा चमचा,जिरं अर्धा चमचा

6)वरचा बेस करण्यासाठी लागणारे साहित्य -शिमला मिरची 1 बारीक कापलेली,

मोजरेला चिज 50 ग्रॅम, पार्मेसन चीज 100 ग्रॅम

pizza
हेल्दी डाएट : शेतीपासून तुमच्या ताटापर्यंत...

पिझ्झा बनविण्याची कृती

  • सर्व प्रथम एका मोठया भांडयात मैदा, मिठ, इटालियन मसाला, साखर, मध, ईस्ट आणि करडीचे तेल सर्व मिसळून चांगले मिश्रण तयार करावे.

  • या मिश्रणात हळूहळू 1 कप कोमट पाणी घालावं. त्याची चांगली घट्ट कणिक तयार करून घ्यावी. ही कणीक काही वेळ फ्रिज मध्ये ठेवा.

  • नंतर त्यास बाहेर काढून परत चांगली मळुन घ्यावी .नंतर त्यात तेला टाकुन ते पिठ एकजिव करुन घ्यावे.

  • पुढे त्या पिठाचे 2 , 3 गोल बनवून घ्यावे. एका प्लास्टीक कव्हर च्या मदतीने या गोलांना पिझ्झाच्या आकारात हाताने पसरवा. लक्षात ठेवा की जास्त जाड नको व पातळ नको. त्यावर सूजी पसरवा त्यामुळे पिझ्झा कुरकुरीत होईल.

  • आता कूकी शीटवर हा कच्चा पिझ्झा ठेवा, झाकताना तो पूर्णपणे झाकला गेला पाहिजे. नंतर त्याच्या कडेला तेलाने ब्रश करा. त्यानंतर 2 चमचे पिझ्झा साॅस पिझ्झा वर पूर्ण भागात पसरवा. यानंतर मोजरेला चीज किसून त्यावर टाका.

pizza
जागतिक अन्नसुरक्षा दिनविशेष : 'जेवणासोबत पुस्तकांची मेजवानीची'

पिझ्झा साॅस कसा तयार करायचा ?

मोठया भांडयात तेल घ्या.मंद आचेवर गरम होवू दया. नंतर कापलेला लसुण, जिरे, कांदा काप, 5 मिनीटे परतून घ्या, त्यात कापलेले टमाटर टाका. 5 मिनीटं परत होउ दया, नंतर 5 , 10 मिनीटापर्यंत टमाटर चांगले होउ द्या. त्यानंतर त्यात टमाटर पल्प, मिरची पावडर, टाकून चांगले खरपुस होऊ द्या. नंतर थंड होउ दया.

पिझ्झावर पिझ्झा साॅस टाकून झाल्यावर त्यावर कापलेली शिमला मिरची, पार्मेसन चीज किसून मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये 30 मिनीटां साठी ठेवुन दया. नंतर बाहेर काढून तुम्ही घरी हाताने केलेला गरमागरम पिझ्झा खायला घेऊ शकता.

pizza
अन्न व औषध प्रशासनाचे खाद्यपदार्थांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष

टिप्स

1)पिझ्झास वरील थरावर आपण आपल्या पध्दतीने सजवू शकता.

2)तयार पिझ्झा कणिक 3 – 4 दिवसापर्यंत फ्रिज मध्ये चांगली राहाते.

3)ओव्हन मध्ये जास्त वेळ ठेवून कूरकूरीत पिझ्झा तयार होवू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com