Dog Food : 'हे' पदार्थ कुत्र्यांना खायला देताना जरा सांभाळून! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dog Food
Dog Food : 'हे' पदार्थ कुत्र्यांना खायला देताना जरा सांभाळून!

Dog Food : 'हे' पदार्थ कुत्र्यांना खायला देताना जरा सांभाळून!

आजकाल अनेक लोक कुत्रा, मांजर आवडीने पाळतात. लोकं कुत्र्यांची खूप काळजी घेतात. त्यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करतात. म्हणूनच आपण जे खाऊ ते त्याला खायला देतात. तज्ज्ञांच्या मते, पाळीव प्राण्यांना आपल्याप्रमाणे खाऊ घालणे टाळले पाहिजे. कुत्र्याच्या शरीरातील अंतर्गत पचनसंस्था आणि एन्झाईम्स माणसांप्रमाणे नसतात, त्यामुळे आपण खातो ते पदार्थ पाळीव प्राण्याच्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कुत्र्याला प्रेमाने काहीही खायला देताना त्याच्या तब्येतीचा विचार करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: मुलींनो, Long Hair हवेत! आहारात करा या Vitamins चा समावेश

Chocolate

Chocolate

हे ८ पदार्थ खायला देऊ नका

लसूण- नुसती लसूण कुत्र्यांना खायला देणे हानीकारक ठरू शकते. लसणीत थायोसल्फेट असते. त्यामुळे रक्त पेशींवर परिणाम होऊ शकतो.

चॉकलेट - अनेक लोकं कुत्र्यांना आवडीने चॉकलेट खायला घालतात. चॉकलेट कुत्र्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. ते कुत्र्यांसाठी विष असते. त्यामुळे कुत्र्याला अजिबात चॉकलेट खायला देऊ नये.

हेही वाचा: कॉफी उत्पादनाला हवामान बदलामुळे बसणार मोठा फटका, संशोधकांचा दावा

कॉफी (Coffee)

कॉफी (Coffee)

कॉफी -काहीजण कुत्र्याला कॉफी प्यायल्याही देतात. त्यात कॅफीन असते. कुत्र्यांच्या आरोग्यासाठी कॅफीन हानीकारक आणि विषयुक्त रसायन मानले जाते. कॉफी पिऊन कुत्र्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. परिणामी कुत्र्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

मोहरी- नेहमीचे पदार्थ कुत्र्यांना खायला देतात त्यात मोहरी नसेल असा प्रयत्न करावा. कुत्र्यांसाठी मोहरी चांगली नाही. त्यात विषारी संयुगे असतात. त्यामुळे कुत्र्यांना स्ट्रोएन्टेरिटिस होऊन त्यांच्या पोटाला सूज येते. त्यामुळे कोणतेही पदार्थ देताना सांभाळूनच.

हेही वाचा: मटण, चायनिज, चॉकलेट, चहा-कॉफीमुळे वाढू शकते डोकेदुखी

Avocados

Avocados

अॅव्होकाडो- माणसांच्या आहारात अॅव्होकाडो खाल्ल्याने अनेक फायदे दिसून येतात. पण कुत्र्यांसाठी ते चांगले नाही. हे कुत्र्यांसाठी विषारी ठरू शकते. त्यामुळे त्यांच्यात आतड्यांसबधी समस्या निर्माण होतात.

चहा- चहा केल्यानंतर त्याची पावडर आपण फेकून देतो. पण काहीवेळा चुकून कुत्रे ही चहा पावडर खातात. असं खाल्ल्यानंतर त्यांना खाज सुटते शिवाय त्वचेच्या समस्या वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्या त्वचेवर परिणाम होतो तो वेगळाच. शिवाय त्यांना खोकलाही येऊ शकतो. त्यामुळे चहा पावडर जनावरांसाठी विष आहे.

हेही वाचा: Grapes Benefits : द्राक्ष खाण्यामुळे होतात पाच चांगले परिणाम

Grapes

Grapes

कच्चे मांस किंवा मासे- कच्च्या अंड्याप्रमाणेच मांस किंवा माश्यात विषाणू असतात. त्यामुळे अन्नाची विषबाधा होऊ शकते. सॅल्मन, ट्राउट, शेड किंवा स्टर्जन सारखे काही मांसे खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होते. उलट्या, ताप येतो. त्यामुळे हे मासे त्यांना खायला देणार असाल तर ते मासे नीट शिजवा.

द्राक्षे, मनुका- द्राक्षे किंवा मनुका खाल्ल्याने कुत्र्याच्या मूत्रपिंडावर परिणाम होतो, त्यामुळे त्यांना मनुका खायला अजिबात देऊ नका, यामुळे पोट खराब होऊ शकते. तसेच इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

Web Title: Dog Food Toxic And Dangerous Foods Your Dog Should Never Eat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top