No Tomato Recipes : महागलेल्या टोमॅटोला करा बाय बाय, त्याशिवायच या टेस्टी रेसिपी करा ट्राय

टोमॅटोचे भाव देशाला रडवत आहेत. त्यामुळे त्या शिवायच करायच्या रेसिपी आता जाणून घ्या.
Tomato Rates
Tomato Rates esakal

Indian Recipes Without Tomatoes In Marathi : टोमॅटोला आला सोन्याची लागण झाल्यासारखे त्याचे दर दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. सध्या शंभरी पार करून १६० रुपये किलोने टोमॅटो विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हा भार सोसेनासा झाला आहे. पण खाणं-पिणं तर सोडू शकत नाही ना. त्यासाठी टोमॅटो न टाकताही टेस्टी पदार्थ कसे बनवणार, याच्या खास रेसिपीज घेऊन आलो आहोत.

Tomato Rates
Tomato Rates esakal

काळ्या चण्यांची उसळ

1 कप काळे चणे
- 1 टी स्पून जीरे
- 2 टेबल स्पून तूप किंवा तेल
- 1 टी स्पून लाल मिरची पाउडर
- 2-3 हिरव्या मिरच्या
- 1 टी स्पून लाल मिरची पाउडर
- 1/2 टी स्पून गरम मसाला
- 1/2 टेबल स्पून चाट मसाला
- 1/2 टी स्पून हळद
- 1/2 टी स्पून धणेपूड
- 1 टेबल स्पून कोथिंबीर
- मीठ चविनुसार

Tomato Rates
Bajra Cake Recipe : व्हाइट हाऊसमध्ये पीएम मोदींसाठी बनवलेला खास बाजरा केक घरी कसा बनवाल? नोट करा रेसिपी

कृती

काळे चणे रात्रभर भीजत ठेवा. कुकरमध्ये चणे शिजवून घ्या. फोडणीसाठी कढईत तेल घ्या. गरम झाल्यावर त्यात जीरे, हिरवी मिरची नीट परतून घ्या. हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणे पूड, चाट मसाला आणि मिठ घालावे. ४-५ मिनीटे शिजवून घ्या. त्यात चणे घालावे. २-३ मिनीटे शिजवून घ्या.

Tomato Rates
Tomato Rates esakal

ओट्स उपमा

2 कप ओट्स
- 1 बारीक चीरलेला कांदा
- 1 बारीक चीरलेलं गाजर
- 1/2 कप मटर
- 1 मीडियम शिमला मिरची बारीक चीरून
- 1/2 टी स्पून उडीद डाळ
- 1 टेबल स्पून खिसलेलं खोबरं

- 1 टेबल स्पून तेल
- 5-6 कढीपत्ता
- मोहरी
- लिंबाचा रस
- मीठ
- हळद
- कोथिंबीर

कृती

एका कढईत तेल गरम करावे. त्यात ओट्स, हळद, मीठ, हिरवी मिरची टाकून परतून घ्या. थोडे पाणी टाकून झाकून ठेवा. नरम होईपर्यंत शिजवा.

दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी, त्यात उडद डाळ घाला. नीट भाजून घ्या. त्यात कढीपत्ता, मीठ, हळद, कांदा टाकून परता. चांगला गोल्डन रंग येऊ द्या. आता त्यात गाजर, मटार घालावे आणि १ मिनीट शिजू द्यावे. गाजर नरम झाल्यावर शिमला मिरची घाला. आता या भाज्या ओट्समध्ये टाका. १ मिनीट शिजू द्यावे.

Tomato Rates
Cheesecake Recipe : घरात उपलब्ध असलेल्या सामानापासून बनवा चिजकेक; रेसिपी आहे एकदम सोपी!
Tomato Rates
Tomato Rates esakal

दही आलू

4 उकडलेले बटाटे
- 1 1/2 कप दही
- 2 टेबल स्पून बेसन
- 1 टी स्पून जीरे
- 1 कांदा बारीक चीरलेला
- 3 लसूण पाकळ्या बारीक चीरून
- 2 हिरवी मिरची बारीक चीरलेली
- 1 टी स्पून लाल तिखट
- 1 टी स्पून धणेपूड
- 1/2 हळद
- 1/3 टी स्पून हींग
- 2 टेबल स्पून तेल
- मीठ
- कोथिंबीर

कृती

उकडलेल्या बटाट्यांचे काप करून घ्या. एका बाऊलमध्ये दही, बेसन आणि पाणी घाला. नीट फेटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जीरे, हिंग टाकावे. काही वेळाने कांदा घाला. आता त्यात आले, लसूण आणि हिरवी मिरची टाका. कढीपत्ता टाका आणि २ मिनीट शिजवा. लाल तिखट, हळद, कोथिंबीर घालावी. थोडं पाणी घालून ४-५ मिनीट शिजवा. कढईत चीरलेले बटाटे घाला. आच कमी करून त्यात दह्याचे मिश्रण घाला. मीठ घालून ५-६ मिनीट शिजवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com