
Upvas Recipe: उपवास हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग आहे. उपवासाच्या दिवशी चविष्ट पण सात्विक पदार्थ बनवणे ही खास परंपरा आहे. अशा वेळी लाल भोपळ्याचे घारगे हा एक उत्तम पर्याय आहे. हे घारगे केवळ चवदारच नाहीत, तर बनवायला सोपे आणि पौष्टिकही आहेत. लाल भोपळ्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर भरपूर असतात. ज्यामुळे उपवासात ऊर्जा टिकून राहते. घारग्याची रेसिपी साधी असून, घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्याने ती तयार करता येते. उपवासाच्या दिवशी काहीतरी वेगळे आणि स्वादिष्ट खायची इच्छा असेल, तर लाल भोपळ्याचे घारगे नक्की बनवून पाहा.