कांदे भजी मऊ होऊ नये म्हणून वापरा 'ही' ट्रिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

food

अनेकवेळा भजींना वारा लागला की ते मऊ पडतात आणि मग ते खाण्याची मजा निघून जाते.

कांदे भजी मऊ होऊ नये म्हणून वापरा 'ही' ट्रिक

गरमा गरमा कांदा भजी आणि चहा हे एक वेगळं परफेक्ट कॉंबिनेशन आहे. हल्ली केव्हाही वेळी अवेळी पाऊस पडतो आणि मग काही चमचमीत खायची चव येते. अशा वेळी मॅगी, भजी, चहा अशा चटपटीत पदार्थांना अनेकजण पसंती देतात. मात्र अशा सुंदर वातावरणात कधीकधी गरमा गरम कांदे भजींचा बेत फसतो. अशावेळी काही सोप्या टिप्स माहित असणे गरजेचे असते. अनेकवेळा भजींना वारा लागला की ते मऊ पडतात आणि मग ते खाण्याची मजा निघून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कांदे भजींची एक ट्रीक सांगणार आहोत..

हेही वाचा: ग्लॅम-फूड : ‘डाएटबाबत कधीही तडजोड करत नाही’

साहित्य -

  • उभा चिरेलला कांदा - ४

  • मीठ - आवश्यकतेनुसार

  • जिरे पावडर - आवश्यकतेनुसार

  • तेल - आवश्यकतेनुसार

  • तिखट - आवश्यकतेनुसार

  • हळद - आवश्यकतेनुसार

  • बेसण पीठ - ४ वाट्या

कृती - सुरुवातील उभा कांदा बारिक चिरुन घ्या. तो बाजूला ठेवा यात थोडे मीठ टाका आणि त्याला काही काळ पाणी सुटु द्या. एका दुसऱ्या भांड्यात बेसन पीठ घेऊन त्यात हळद, मीठ, लाल तिखट आणि जिरे पावडर टाका. यात पाणी न घालता पीठ त्या कांद्याला पाणी सुटलेल्या मिश्रणात भिजवून घ्या. थोड्यावेळासाठी ते तसेच ठेवा. एका बाजूला कढईत तेल गरम करुन घ्या. याता आता ते तयार पीठाचे बारीक आकाराचे भजी तेलात सोडा. आणि मंद आचेवर ते तांबूस होईपर्यंत तळून घ्या. तयार गरमा गरम भजी तुम्ही चहा आणि पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींसोबत एंजॉय करु शकता.

हेही वाचा: थंडीत अनेक आजारांवर मात करेल 'ही' बर्फी ; जाणून घ्या रेसिपी

loading image
go to top