रात्री भात खाणे योग्य असते का? जाणून घ्या तथ्य | Rice Benefits | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rice Benefits
रात्री भात खाणे योग्य असते का? जाणून घ्या तथ्य | Rice Benefits

रात्री भात खाणे योग्य असते का? जाणून घ्या तथ्य

भारतात भात खूप खाल्ला जातो. तो कार्बोहायड्रेटचा चांगला स्त्रोत आहे. खाण्यास तसेच पचण्यास सोपा असलेल्या भातापासून पुलाव, बिर्याणी, खीर, डोसा इत्यादी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. तर, डाळी, छोले, राजमा आणि कढीबरोबर भात खाणेही अनेकांना आवडते. भात खाण्यामुळे आरोग्याचे अनेक फायदे होतात. तुमची पचनशक्ती चांगली ठेवण्यासोबतच अॅंटी ऑक्सिडंटयुक्त भात खाल्ल्याने फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी होण्यासही मदत होते. तसेच, फायबर आणि प्रथिने पुरेश्या प्रमाणात असल्याने मधुमेहाच्या रूग्णांना त्याचा फायदा होतो.

हेही वाचा: उष्माघातापासून संरक्षण मिळवायचंय! या पाच गोष्टी करा|Heat Wave Care

rice

rice

होतील हे फायदे

तज्ज्ञांच्या मते, तज्ञ फायबर भरपूर असल्याने भात हलका होतो तसेच सहज पचतो. त्यामुळे रात्री भात खाण्याने काही नुकसान होत नाही. उलट चांगली झोप येण्यासही भात उपयुक्त ठरतो. जे लोक खूप बारीक असतात, त्यांनाही रात्री भात खाण्यामुळे अडचण येत नाही.पण जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मात्र रात्री भात खाणे टाळले पाहिजे. रात्रीऐवजी तुम्ही सकाळी भात खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला पोषण मिळेल शिवाय वजनही वाढणार नाही. दिवसा चयापचय क्रिया वेगाने काम करते. त्यामुळे तुमचे शरीर वेगाने अन्न पचवते. म्हणून दिवसा भात खाल्ल्यास तो लवकर पचू शकतो. तसेच यामुळे तुम्हाला उर्जा मिळते. तांदूळात कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे तुमच्या शरीराला आणखी एनर्जी मिळते.

हेही वाचा: नाश्ता, जेवणाची योग्य वेळ कोणती? आयुर्वेद काय सांगते जाणून घ्या!

Web Title: Eat Rice At Night Know The Benefits Of Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top