दूध आणि केळी एकत्र खाणे आरोग्यासाठी किती फायद्याचे? जाणून घ्या

दुध आणि केळी एकत्र खाल्ल्याचा किती फायदा होतो?
दुध आणि केळी एकत्र खाल्ल्याचा किती फायदा होतो?

औरंगाबाद : केळीत खूप जीवनसत्त्व व पोषक तत्त्वे असतात. फायबरच नाही तर अनेक आजारांपासून वाचवण्याचे काम ती करते. दुसरीकडे दुधापासून शरीराला कॅल्शियम आणि जीवनसत्त्व ड मिळते. मात्र दुध आणि केळी एकत्र खाल्ल्यास शरीराला जास्त पोषकतत्त्वे मिळतात का? विशेषतः वजन वाढविण्यासाठी लोक नेहमी दुध-केळी खाण्याचा सल्ला देतात.

- दूध आणि केळी एकत्र करुन शेक किंवा इतर प्रकारचे डिश बनवले जाऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की केळी व दूधाचे काॅम्बिनेशन योग्य नाही. अनेक डाॅक्टर बनाना शेकला होकर देत नाहीत.

- दूध प्रोटीन, जीवनसत्त्व आणि रायबोफ्लेविन, जीवनसत्त्व बी १२ सारखे खनिजाचे स्त्रोत आहे. १०० ग्रॅम दूधात जवळपास ४२ कॅलरीज असतात. मात्र दुधात जीवनसत्त्व क, डायट्री फायबर नसते. या व्यतिरिक्त कार्बोहायड्रेटही कमी असते. मात्र शाकाहारींसाठी दूध प्रोटीनचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.

- दुसरीकडे केळी जीवनसत्त्व बी सहा, मॅग्निज, जीवनसत्त्व क, डायटरी फायबर, पोटॅशियम आणि बायोटीनसारखे जीवनसत्त्वांनी पूर्ण असते. १०० ग्रॅम केळीत ८९ कॅलरीज असतात. केळी खाल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. खर्च केलेली ऊर्जा पुन्हा मिळते. जास्त कार्बोहायड्रेट असणारे हे फळ व्यायामाच्या अगोदर आणि नंतरचा एक चांगला स्नॅक्स मानला जातो.

केळी
केळी

- दुध आणि केळीच्या काॅम्बिनेशनला अनेक जण आदर्श मानतात. कारण दूधात नसलेले पोषकतत्त्वे केळीत असतात. तसेच केळीत नसलेले दुधात.

- अनेक अभ्यासांनुसार केळी आणि दूध एकाच वेळी खाण्याने पचन यंत्रणेबरोबरच सायनसही प्रभावित होते. सायनस आकुंचन पावल्याने थंडी, खोकला आणि इतर अॅलर्जीसारख्या गोष्टी होऊ शकतात. बहुतेकांचे म्हणणे आहे, की दूध-केळी एकत्र खाल्ल्याने पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतात. खूप दिवस खाल्ल्याने उलटी आणि जुलाबचाही त्रास होऊ शकतो.

- आयुर्वेदात सांगितले आहे, की फळ आणि द्रवाचे मिश्रणापासून लांब राहिले पाहिजे. आयुर्वेदानुसार, केळी आणि दूध शरीरात टाॅक्सिफिकेशनला प्रोत्साहित करतात आणि शरीरात होत असलेल्या इतर क्रियांवर परिणाम करतात. केळी-दुधबरोबर खाल्ल्याने शरीरात जडपण वाटू लागते आणि डोक हलक व्हायला लागते.

- जर तुम्हाला दूध आणि केली एकाच वेळी घ्यायची इच्छा होत असेल तर ते अलटून-पलटून खाणे योग्य राहिल. म्हणजे एकत्र न घेणे. व्यायाम करण्यापूर्वी स्नॅक म्हणून दूध प्या आणि २० मिनिटांनतर केळी खा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com