
Metabolism वाढवायचा आहे? सकाळी उपाशी पोटी खा हे पदार्थ
प्रत्येकाला निरोगी राहायचं असतं. त्यामुळे प्रत्येकजण योग्य आहार घेण्याचा प्रयत्न करतो. पण अनेकजणांना प्रश्न पडतो की सकाळी उपाशी पोटी काय खावे? सकाळी उठल्याबरोबर आपल्या शरीराला लगेच ऊर्जेची गरज असते. यामुळे सकाळचा आहार नेहमी पोषक असणे, गरजेचे आहे. सकाळचा आहार उत्तम असला की दिवस उत्तम जातो. याशिवाय पोटाच्या समस्या किंवा पचनशक्ती तसेच मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर योग्य आहार घेणे, गरजेचे आहे. (follow breakfast in morning which boost your metabolism)
हेही वाचा: मुलांमधील long covidपासून राहा सावध ! अशी आहेत लक्षणे
मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर खालील पदार्थ खा
1. खजूर (Dates)
जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात खजुरांनी करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल तसेच तुमचा मेटाबॉलिज्म वाढवण्यात प्रभावी ठरू शकेल. खजूर हे इन्स्टंट एनर्जी फूड आहेत. खजूरमध्ये विरघळणारे फायबर आढळते, जे योग्य पचनक्रिया ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी देखील हे प्रभावी सिद्ध होऊ शकते.
2. मनुका (Raisins)
भिजलेले मनुका रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावे. रोज मनुका खाल्ल्याने पचनाच्या समस्यांवर मात करता येते. मनुकामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. हे भिजवून खाल्ल्याने अनेक फायदे होतात, ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून संरक्षणसुद्धा करु शकता. भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीरातील कर्करोगही टाळता येतो.
3. भिजवलेले बदाम (Soaked Almond)
दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाणे उत्तम आहे.भिजवलेले बदाम खाल्ल्याने तुमचा मेटाबॉलिजम वाढतोच सोबत तुम्हाला सकाळी सकाळी ऊर्जा मिळते तसेच पोटाच्या अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. जर तुम्हाला बद्धकोष्ठताची समस्या असेल तर दररोज सकाळी भिजवलेले बदाम खा.
हेही वाचा: सॅनिटरी पॅड वापरताना स्वच्छता राखली नाही तर होऊ शकतो कर्करोग
4. पपई (Papaya)
सकाळी रिकाम्या पोटी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पचनक्रिया सुधारण्यासोबतच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी पपई हे खूप फायदेशीर मानले जाते. मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी पपई खूप फायदेशीर ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे चांगले आहे, कारण त्यात पोट साफ करणारे गुणधर्म आहेत
5. सबजा (Chia Seeds)
सबजा तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. सबजा प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत, कारण त्यामध्ये अत्यावश्यक अमीनो ॲसिड असतात, जे मॅग्नेशियम, लोह आणि बी-व्हिटॅमिनने भरलेले असतात. मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी तुम्ही सबजांचे सेवन देखील करू शकता. सबजा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा.
Web Title: Follow These Breakfast In Morning Which Boost Your Metabolism
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..