मुलांमधील long covidपासून राहा सावध ! अशी आहेत लक्षणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child covid

मुलांमधील long covidपासून राहा सावध ! अशी आहेत लक्षणे

मुंबई : करोनाचा संसर्ग ओसरला असला तरीही अजून धोका पूर्णपणे टळलेला नाही. विशेषत: मुलांमध्ये करोनाचा संसर्ग दीर्घकाळ टिकताना दिसून येत आहे. युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका येथे झालेल्या अभ्यासानुसार करोनाचा संसर्ग झालेल्या एक चुतर्थांश मुलांमध्ये करोनाची दीर्घकाळ लक्षणे टिकून राहतात. याला long covid असे म्हणतात.

हेही वाचा: वाढत्या उन्हापासून बाळाला कसे सुरक्षित ठेवाल ?

शाळकरी वयातील मुलांसंबंधीचा अभ्यास बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. बुल्गेरियामध्ये करोना महासाथीच्या आधी मुलांमध्ये पोटदुखीची समस्या दिसून येत होती. याच मुलांमध्ये उलटी, मळमळ, भूक न लागणे, डिस्सेमियासारखी लक्षणे दिसून आली. काही मुलांमध्ये वास न येण्यासारखीही समस्या दिसून आली.

दीर्घकाळ करोनाने ग्रस्त असलेल्या मुलांना उभे राहिलेल्या थकवा, चक्कर अशा समस्या जाणवतात. तसेच जलद स्पंदने, हृदयात वेदनाही जाणवतात. पायांमध्ये वेदना होतात व डोके जड होते. परिणामी मुले खेळणे थांबवतात. long covidची लक्षणे संसर्गानंतर चार आठवड्यांनी दिसून येतात.

हेही वाचा: मुलांच्या भावनिक विकासासाठी तुम्ही काय करता ? बुद्ध्यांकापेक्षा महत्त्वाचा आहे भावनांक

long covid असलेल्या मुलांना डोकेदुखी आणि ब्रेनफ्रॉग ही लक्षणे जाणवतात. इतर कोणत्याही संसर्गजन्य आजारापेक्षा लॉंग कोविडमध्ये वर्तन समस्या अधिक दिसून येतात. या सर्व लक्षणांमुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.

Web Title: Children Facing Long Term Effects Of Covid 19 And It Has An Unusual Range Of Symptoms

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :covid 19Child Care
go to top