
सॅनिटरी पॅड वापरताना स्वच्छता राखली नाही तर होऊ शकतो कर्करोग
मुंबई : मासिक पाळीदरम्यान तुम्ही सुवासयुक्त किंवा जेलयुक्त सॅनिटरी पॅड वापरत असाल तर, सावधान ! असे पॅड अधिक कालावधीसाठी वापरल्याने कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पॅड निवडताना काळजी घ्यावी.
हेही वाचा: लसीकरणानंतर मासिक पाळी थोडी उशीरा येऊ शकते: संशोधनाचा निष्कर्ष
ज्या पॅड्समध्ये अधिक काळ रक्त शोषून घेण्याची शक्यता असते त्यात जेलचा वापर केलेला असतो. त्यामुळे असे पॅड्स वापरू नयेत. अशा पॅड्समध्ये डायऑक्सिन आणि सुपर अॅब्सॉर्बंट पॉलिमरचा वापर केलेला असतो. त्यातून होणाऱ्या संसर्गामुळे गर्भाशयाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात.
सॅनिटर पॅडच्या वापराचे दुष्परिणाम
१. गर्भाशयाचा कर्करोग
२. वंध्यत्व
३. हार्मोन्सचे असंतुलन
४. त्वचेवरील ओरखडे
५. योनीमार्गातील संसर्ग
६. सूज
७. ओटीपोटात सूज
८. थायरॉइड
हेही वाचा: मुलींना १० व्या वर्षी का येते मासिक पाळी?
९. सॅनिटरी पॅडला पांढरेशुभ्र ठेवण्यासाठी डायऑक्सिनचा वापर केलेला असतो. याचा परिणाम म्हणून गर्भाशयाचा कर्करोग, हार्मोन्सचे असंतुलन, डायबिटीज आणि थायरॉइड या समस्या उद्भवू शकतात. पॅडमध्ये कापसापेक्षा रेयॉनचा वापर केला जातो. शोषून घेण्याच्या कमी क्षमतेमुळे रेयॉन अस्वच्छ राहातो व संसर्ग होऊन कर्करोग होऊ शकतो. पॅडमधील सुवासामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो. बराच कालावधीसाठी पॅड वापरल्याने योनीमार्गात बॅक्टेरिया तयार होऊ शकतात. यामुळे अतिसार, ताप आणि रक्तदाबाच्या समस्या उद्भवतात.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवाल २०१५-१६ अनुसार ग्रामीण भागातील ४८.५ टक्के महिला, शहरातील ७७.५ टक्के महिला सॅनिटरी पॅड वापरतात. organic cloth pads हे तुलनेने सुरक्षित असतात. ते धुवून पुन्हा वापरता येतात. तसेच menstrual cupचा वापर अधिक सुरक्षित व पर्यावरणपूरक ठरतो. हे कप गरम पाण्यात धुवून पुन्हा वापरता येतात.
Web Title: Use Of Sanitary Pads Leads To Cancer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..