Tandoor naan: 'या' टिप्स फॉलो करून घरच्या घरी तयार करा तंदूर शिवाय नान अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळतात तसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tandoor naan

Tandoor naan: 'या' टिप्स फॉलो करून घरच्या घरी तयार करा तंदूर शिवाय नान अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळतात तसे

आज आम्ही तुम्हाला तंदूरी नान पॅनमध्ये कसे तयार करायचे याविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहोत.

कढईच्या झाकणावर तंदूरी नान बनवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.


साहित्य:

● दोन वाटी मैदा

● अर्धा बेकिंग सोडा

● अर्धा चमचा मीठ

● एक चमचा बारीक केलेली साखर

● अर्धी वाटी दही

● दोन चमचे तेल

● गरम पाणी

● बारीक चिरलेला लसूण

● बटर

● बारीक चिरलेली कोथिंबीर

हेही वाचा: Recipe: राजस्थानी स्पेशल गट्ट्याची भाजी कशी तयार करायची?

कढईच्या झाकणावर नान कसे तयार करावे?

कृती:

कढईच्या झाकणावर नान बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात मैदा घ्या. त्यात मीठ, साखर घालून चांगले मिक्स करा. यानंतर त्यात दही आणि बेकिंग सोडा टाकून दोन मिनिटे तसेच राहू द्या. नंतर तेल आणि थोडे कोमट पाण्याच्या मदतीने मऊ पीठ मळून घ्या. त्याच भांड्यात थोडे तेल ग्रीस करून पीठ घालून पुन्हा मळून घ्या आणि दहा मिनिटे सेट करण्यासाठी ठेवा.

थोड्या वेळानंतर पीठ परत एकदा मळून घ्या आणि त्याचे गोळे लांब लांब लाटून घ्या. त्यात बारीक चिरलेला लसूण आणि थोडी कोथिंबीर शिंपडा आणि बोटांनी दाबून उलटा करा. नानच्या विरुद्ध बाजूला थोडेसे पाणी लावून एका बोटाने दाबावे. आता गॅसवर पॅन गरम करा आणि पॅनच्या झाकणात नान चिकटवा. ते उलटे करुन कढईवर अर्धवट झाकून ठेवा आणि शिजवा. नानमध्ये काही बुडबुडे तयार होताना दिसले की ते उलटे करून शिजवा. प्लेटवर हलक्या हाताने काढा आणि ब्रशने संपूर्ण नानवर बटर लावा. तुमचे तंदूरी नान तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या भाजीसोबत सर्व्ह करू शकता.

Web Title: Follow These Tips And Prepare Naan At Home Without Tandoor Just Like You Get In Restaurant

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..