Food : मुलं भाज्या खायला दमवतात ; ही रेसिपी नक्की ट्राय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vegetable tikki

Food: मुलं भाज्या खायला दमवतात; ही रेसिपी नक्की ट्राय करा

घरात जरा नावडती भाजी केली की, लहान मुलं हमखास नाकं मुरडतातच.पण केवळ आवडीच्या भाज्या खाल्ल्याने इतर भाज्यांमधील पोषण तत्व त्यांना मिळत नाही. त्यामुळे आजच्या आयांचा शोध सुरू होतो. काहीतरी करून मुलांना विविध भाज्या खायला देणे हे जणू त्यांचे टार्गेट आहे.  यासाठी आज एक भाज्यांनी भरलेली रेसिपी पाहुयात.

मुलांना सकाळच्या नाश्त्याला किंवा डब्याला स्नॅक्समध्ये काहीतरी मसालेदार कुरकुरीत हवे असते. यासाठी व्हेजिटेबल टिक्की हा बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या असतात. ही टिक्की कमी मसाल्यातही अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत बनते. 

साहित्य

● ब्रेडचे तुकडे

● उकडलेले बटाटे

● कांदा बारीक चिरून

● शिमला मिरची चिरलेली

● किसलेले गाजर

●स्वीट कॉर्न

● हिरवी मिरची बारीक चिरून

●कोथिंबीर चिरलेली

● लिंबाचा रस

● चवीनुसार मीठ

● मिरची पावडर

● चाट मसाला

● ताजी काळी मिरी

● रवा

● तेल

हेही वाचा: Palak Recipe: अनोख्या पध्दतीने पालक भाजी कशी करावी?

व्हेजिटेबल टिक्कीसाठी पुर्वतयारी

भाजीची टिक्की बनवण्यासाठी ब्रेडचा चुरा करून घ्या. बटाटे उकडवून मॅश करा. कांदा, सिमला मिरची बारीक चिरून तर गाजर किसून घ्या. मिरची आणि कोथिंबीरही बारीक चिरून घ्या.व्हेजिटेबल कशी बनवावीटिक्की बनवण्यासाठी रवा आणि तेल सोडून सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्या. हाताला तेल लावून सर्व मिश्रणाच्या लहान गोल टिक्की बनवून घ्या. आता एका भांड्यात रवा घ्या. त्यावर टिक्की घुसळवुन सर्व बाजूने रवा लावून घ्या. आता सर्व टिक्की तयार झाल्यावर तळून घ्या. तळून घ्यायच्या नसतील तर तव्यावर थोडं तेल टाकून फ्राय करून घ्यावे.

Web Title: Food How To Make Vegetable Tikki

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..