शिमला मिरचीची भाजी बनवताय तर मग 'या' प्रकाराचा वापर करुन वाढवा चव

food.
food.

औरंगाबाद: शिमला (ढोबळी) मिरची खाताना जितके स्वादिष्ट लागते, त्या प्रमाणात शरीरासाठीही तितकेच आरोग्यदायी असते. या स्थितीत जाणून घ्या योग्य पद्धतीने शिमला मिरचीची भाजी बनवल्यास त्याचे फायदे आणि नुकसानाविषयी... 

फायदे-
लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाची शिमला मिरचीची चव जितकी चविष्ट असते, तितके शरीरासाठी फायद्याचे असते. यात जीवनसत्त्व (व्हिटॅमिन्स) क, ए आणि बिटा कॅरोटिन असते. जे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगले असते. याचा वापर अनेक पद्धतीने केला जातो. शिमला मिरची काही जण इतर भाज्यांप्रमाणे तळून बनवतात. नूडल्स, सॅलिड आणि गार्निशिंगसाठी ही तिचा वापर केला जातो. ती सर्व खाद्यपदार्थांचे चव वाढवते. क्रंच आणि रंग टिकविण्यासाठी कोणत्या तापमानात शिमला मिरचीची भाजी करावी हे वाचा..

स्टर फ्राय-
कोणत्याही भाजीमध्ये शिमला मिरचीचा काही प्रमाणात कच्चेपणा व क्रंच स्वादमध्ये चांगले लागते. यामुळे शिमला मिरचीला जास्त तापमानात शिजवले जात नाही. जादा शिजवलेली मिरची चवीला चांगली लागत नाही. तसेच दिसायला ही. कडईत आॅलिव तेल टाकून गरम करा. आता यात कापलेली शिमला मिरचीचे तुकडे टाकून चांगले परतून घ्या. स्टर-फ्राईची झालेली शिमला मिरचीचे सॅलिड, नूडल्स, पुलाव आणि सूपमध्ये उपयोग करा

ग्रिलिंग-
गॅस किंवा ग्रिल पॅनवर दोन ते चार मिनिटांपर्यंत दोन्ही बाजूंनी हलकेसे ग्रिल करा. ग्रिल झालेली शिमला मिरची एका चिमचाभर आॅलिव्ह तेल टाका. ग्रिल करण्यापूर्वी ही तेल लावू शकता. असे केल्यास तिचा रंगही बनून राहिल. यास व्हेजिटेरियन पुलाव किंवा दुसऱ्या भाजींमध्ये टाकून खा. 

मायक्रोवेव्ह-
मायक्रोवेव्ह सेफ लिड बोल किंवा प्लेटमध्ये थोडे पाणी टाकून त्यात शिमला मिरची ठेवा. त्यास प्लास्टिक रॅपच्या कव्हर करुन जवळपास २-३ मिनिटांपर्यंत शिजवा. मायक्रोवेव्हमध्ये थोडेसे शिजवलेली शिमला मिरची सूप किंवा सॅलिडमध्ये टाकून खाल्ले जाऊ शकते.

साॅते-
शिमला मिरचीला छोट्या आकारात कापा. फ्राइंगपॅनमध्ये आॅलिव्ह तेल टाका. आता त्यात बारीक कापलेली शिमला मिरचीचे तुकडे टाका. वाढण्यापूर्वी त्यात मिठ आणि काली मिरचीचे पावडर  टाकून पुन्हा साॅते करा. साॅतेने झालेली शिमला मिरची पुलाव, बिर्याणी किंवा दुसऱ्या भाजींमध्ये टाकून चव वाढवता येऊ शकते.    

(संपादन - गणेश पिटेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com