esakal | भारतातील 'हे' पदार्थ परदेशातही लोक खातात आवडीने; जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

samosa

भारतातील विविध पदार्थ आणि त्यांच्यात वापरलेल्या विविध मसाल्यांमुळेही बरीच प्रसिद्ध आहेत

भारतातील 'हे' पदार्थ परदेशातही लोक खातात आवडीने; जाणून घ्या

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

भारतातील काही पदार्थ परदेशातही बरीच प्रसिद्ध आहेत. भारतातील विविध पदार्थ आणि त्यांच्यात वापरलेल्या विविध मसाल्यांमुळेही बरीच प्रसिद्ध आहेत. संपूर्ण जगात कुठेही गेला तरी तिथे भारतीय पद्धतीचे जेवन मिळणारे हॉटेल असते. चला तर मग पाहूया कोणते भारतीय पदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत.

1. चाट-
भारतात चाट हे प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक आहे. तसेच बऱ्याच लोकांचा हा आवडता नाश्ताही आहे. तळलेले पापड, दही, बटाटे, विविध मसाले आणि काही भाज्यांचे मिश्रणाचा हा पदार्थ. या डिशला जगभरातील आणि विशेषतः यूकेमध्ये प्राधान्य दिले जाते. यावर कदाचित तुमचा विश्वास नसेल पण ब्रिटनसह जगातील इतर बर्‍याच देशांमध्ये चाटला एक मजेदार स्नॅक म्हणून प्राधान्य दिले जाते.

Summer recipe : पारंपारिक पद्धतीने घरी बनवा वाळवणीची दही मिरची

समोसा-
आणखी एक लोकप्रिय भारतीय स्नॅक आहे जे बर्‍याच पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमात दिसून येते ते म्हणजे समोसा आहे. चहासोबत सर्वात आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे. हा पदार्थ खारट आणि गोड अशा दोन्ही प्रकारात बनवता येऊ शकते.

शिल्लक मलईपासून बनवा या दोन सोप्या रेसिपी

साउथ इंडियन फूड-
दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ जगभरात मोठ्या चवीने खाल्ली जातात. परदेशातील बहुतेक भारतीय रेस्टॉरंटमध्ये इडली आणि डोसा देण्यात येतो. मऊ, उकडलेली इडली केवळ अत्यंत आरोग्यासाठीच चांगली नाही तर ती चवीलाही भारी असते. तसेच त्याबरोबर नारळ चटणी आणि सांबार देखील अतिशय चवदार असते.
 

loading image