esakal | उरलेल्या ताकाचा 'या' रेसिपीजमध्ये करा वापर
sakal

बोलून बातमी शोधा

उरलेल्या ताकाचा 'या' रेसिपीजमध्ये करा वापर

उरलेल्या ताकाचा 'या' रेसिपीजमध्ये करा वापर

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्यास लाभकारक असते. यात कॅलरी आणि फॅट कमी असतात. यामुळे उन्हाळ्यात लोक आहारात आवर्जून ताकाचा समावेश करतात. मात्र ताज्या दहीपासून बनवलेले ताक अधिक चांगले राहते. फ्रीजमध्ये ठेवलेले ताकाकडे अनेकदा दुर्लक्ष होते आणि ते खराब होते. खूप साऱ्या रेसिपीजमध्ये तुम्ही उरलेले ताकाचा वापर करु शकता. ते वापरायचे पाच पद्धती आहेत, ज्यांचा तुम्ही सहज वापर करु शकता.

क्रिमी सलाड : सलाड गार्निश करण्यासाठी ताक वापरु शकता. उरलेल्या ताकात सलाड मिक्स करा आणि वरुन कोथिंबीर, काळी मिरची पावडर मिक्स करा. चवीनुसार मीठ टाका.

माॅर्निंग स्मूदी बनवा टेस्टी : वजन घटविण्यासाठी सकाळच्या नाष्ट्यात तुम्ही फळ किंवा पालक स्मुदी पित असाल तर दहीऐवजी ताक वापरा. त्यासाठी सर्व फळे आणि ताक ब्लेंडरमध्ये टाकून ब्लेंड करा. तुम्ही यात मीठ किंवा गुळसारखे पदार्थ टाकू शकता.

सूप बनवा : वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवण्यासाठी ताकाचा वापर केला जातो. मक्याच्या पीठापासून बनवले जाणाऱ्या सूपसाठी ताक वापरले जाते. त्यामुळे ताकात मक्याचे पीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्या. आता त्यात एक किंवा दोन कटोरी पाणीही टाका. आता गॅसवर कढई ठेवून त्यात हे टाका. दहा ते १५ मिनिटे गरम केल्यानंतर सूप प्यायला तयार. यात देशी तुपात जीरा आणि हिंग टाका. त्यानंतर चवीनुसार मीठ टाका ते मिक्स करु घ्या.

मॅश्ड पोटॅटोज : मॅश्ड पोटॅटोजमध्ये बटाटे पूर्णपणे मॅश केले जातात. बहुतेक लोक मॅश करताना दूधाचा वापर करतात. मात्र तुम्ही त्याऐवजी उरलेले ताक मिक्स करु शकता.

ग्रेव्ही बनवण्यासाठी : मांसाहारी जेवण बनवताना विशेष ग्रेव्हीकडे लक्ष दिले जाते. काही लोक ग्रेव्ही पातळ आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी उरलेले ताकाचा वापर करतात. कारण त्यात क्रिम अधिक असते. मिल्क क्रिमऐवजी ताकाचा वापर केल्यास तुमची नाॅनव्हेड डिश आणखी स्वादिष्ट तसेच आरोग्यदायी होईल.