

Paneer Pasanda Recipe : घरातील खास प्रसंग असो किंवा पार्टीचे नियोजन असो, जेवणाच्या मेनूमध्ये पनीरपासून बनवलेली डिश असतेच असते. आणि त्यात तुम्ही जर पनीर खाण्याचे शौकीन असाल तर मग प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं पनीरची रेसिपी तुम्ही हमखास ट्राय करत असाल.
कधीकधी रेसिपी पाहण्यासाठी आपण गुगलचा आधार घेतो. आता गुगलवर पनीरची रेसिपी शोधणाऱ्या लोकांची संख्या भली मोठी आहे. पण २०२२ मध्ये सगळ्यात जास्त सर्च झालेली रेसिपी कोणती आहे, तुम्हाला माहितीये का?
तर २०२२ मध्ये पनीर पसंदा (paneer pasanda) ही पनीरची डिश ट्रेण्डिंग होती. त्यामुळे २०२२ यावर्षी पनीर पसंदा गुगलवर सगळ्यात जास्त शोधली गेलेली रेसिपी ठरली.
भारतासह पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांमधून या डिशविषयी सगळ्यात जास्त शोध घेण्यात आला होता. गुगलच्या Top Recipes या सेक्शनमध्ये पनीर पसंदाचा उल्लेख क्रमांक एक वर करण्यात आला होता.
याचं पनीर पसंदाची रेसिपी आज बघुया..
पनीर पसंदा बनवण्यासाठी साहित्य-
1 टीस्पून काजू पेस्ट
1/2 टीस्पून कसुरी मेथी
1/2 टीस्पून हळद पावडर
1/4 टीस्पून गरम मसाला
1/2 टीस्पून धने पावडर
250 ग्रॅम पनीर (तुकडे कापून)
1 कप टोमॅटो प्युरी
1 टीस्पून जिरे पावडर
1/2 कप मलाई (मलई)
2 मोठी वेलची
1 तमालपत्र
2 कांदे
लसणाच्या 5 पाकळ्या सोलून
अर्धा इंच आल्याचा तुकडा
2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
1/2 टीस्पून लाल तिखट
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार तेल
कृती :
पनीर पसंदा बनवण्यासाठी प्रथम कांद्याचे मोठे तुकडे करून 8 ते 10 मिनिटे पाण्यात टाका. त्यानंतर भिजवलेले कांदे मिक्सरमध्ये वाटून त्यात आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून बारीक वाटून घ्या.
आता एका कढईत एक चमचा तेल मध्यम आचेवर गरम करा आणि त्यात पनीरचे तुकडे सोनेरी होईपर्यंत तळा.
यानंतर कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात तमालपत्र आणि मोठी वेलची घालावी, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट थोडा वेळ शिजवल्यानंतर त्यात कांद्याची पेस्ट घालून शिजवा. कांद्याचा रंग सोनेरी होऊ लागल्यावर टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.
यानंतर त्यात काजूची पेस्ट घाला आणि ग्रेव्हीमध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे, जिरेपूड आणि मीठ मिक्स करून एक मिनिट शिजवा.
यानंतर ग्रेव्हीमध्ये २ कप पाणी घालून ५ मिनिटे उकळा, त्यानंतर ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी आणि पनीरचे तुकडे घालून २ मिनिटे शिजवा. शेवटी, पनीरमध्ये क्रीम घातल्यानंतर, आणखी 2 मिनिटे शिजवल्यानंतर, गॅस बंद करा. तुमचा आवडता चविष्ट पनीर पसंदा तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.