Food Tips : तुमच्या मसाल्यांमध्ये भेसळ तर नाही ना? घरच्या घरी जाणून घ्या. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Spices

Food Tips : तुमच्या मसाल्यांमध्ये भेसळ तर नाही ना? घरच्या घरी जाणून घ्या.

How to know adulterated Spices : भारतीयांच्या रोजच्या जीवनात मसाल्यांशिवाय जेवण बनू शकत नाही असा जणू अलिखीत नियम आहे. अशावेळी मसाले आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. पण आपण रोज खात असलेले मसाले भेसळयुक्त तर नाहीत ना, याची खात्री करून घेणे पण आवश्यक आहे.

हेही वाचा: Food Tips : स्कीनसहित की स्कीनलेस कोणते चिकन योग्य? चिकन तुमचेही फेवरेट असेल तर 'ही' माहिती वाचाच

बऱ्याचदा बाजारात मिळणारे मसाले हे भेसळयुक्त असण्याची शक्यता असते. असे मसाले खाल्ल्याने अन्न आणि पर्यायाने तुमचे आरोग्य खराब होते. काही सोप्या पध्दतीने तुम्ही मसाल्यात झालेली भेसळ ओळखू शकतात. ही भेसळ बहूतेक वेळा धनेपूड, सुठ पावडर, लाल मिरची, वेलची, जीरे पूड, गरम मसाला, लाल मिरची पावडर यात ओढळते.

हेही वाचा: Food Tips : टेस्टही अन् चवीला बेस्टही, जाणून घ्या रेसिपी

कशी ओळखावी भेसळ जाणून घेऊया

हळद

हळदीत लेड क्रोमेटची भेसळ केली जाते. हे ओळखण्यासाठी हळदीला पाण्यात मिक्स करा. जर भेसळ असेल तर हळद रंग सोडायला लागेल.

हेही वाचा: Food Tips : एनर्जीचे 'ब्रम्हास्त्र' हवे असेल तर 'असा' करा नाष्टा

लाल मिरची पावडर

यात इंट पावडरीची भेसळ केली जाते. हे ओळखण्यासाठी पाण्यात एक चमचा मिरची पावडर टाका. भेसळ असेल तर ही पावडर खरखरीत होते.

जीरे

जीरे घेऊन हातावर रगडा. जर हातावर काही रंग लागला तर समजा की, त्यात भेसळ आहे.

हेही वाचा: Food Tips : या ६ भाज्या व फळे खा, काँस्टीपेशन-डिहायड्रेशन घालवा

केशर

यातील भेसळ ओळखण्यासाठी त्याच्या टोकांना तोडा. जर ते समजावे की, भेसळ आहे. असली केशर सहज तुटत नाही. आर्टिफीशियल केशर सहज तुटते. तसचं असली केशर पूर्ण विरघळेपर्यंत रंग देत राहतो.

हेही वाचा: Food Tips : या गोष्टी दह्यासोबत खाल्यास आरोग्यास धोका

धणे पूड

यात भूशाची भेसळ केली जाते. एका ग्लासात एक चमचा धणे पूड टाकून हलवावे. जर भूसा असेल तर पाण्यावर तरंगू लागतो.