Ghavan Recipe : रोज रोज डब्यात भाजी पोळी देऊन मुल वैतागली आहेत? मग बनवा गव्हाचे घावण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ghavan Recipe

Ghavan Recipe : रोज रोज डब्यात भाजी पोळी देऊन मुल वैतागली आहेत? मग बनवा गव्हाचे घावण

Ghavan Recipe : मुलांना रोज रोज काय डब्यात द्यावं हा प्रश्न असतोच; शिवाय ते नुसतीच भाजी पोळी केली ते ती टेस्टी नसते आणि काहीतरी टेस्टी देण्याचं जरी म्हटल तरी ते पोटभरणार हवं; गव्हाच घावण ही जेवढी टेस्टी आणि नवी तेवढीच पोट भरणारी रेसिपी आहे; शिवाय मुलांनाही काहीतरी नवीन खाण्याचा आनंद; शिवाय तुम्ही हे आपला नाश्ता म्हणूनही बनवू शकतात.

हेही वाचा: Winter Recipe: घरच्या घरी बनवा अगदी रेस्टॉरंट सारखे चवदार टोमॅटो सूप...

साहित्य:

2 कप गव्हाचे पीठ

1/2 कप रवा

1 कांदा बारीक चिरून

1 टोमॅटो बारीक चिरून

3 मिरच्या बारीक तुकडे करून

1 टीस्पून जिरं

1/2टीस्पून आलं लसूण पेस्ट

चवीप्रमाणे मीठ

तेल आणि पाणी

हेही वाचा: Winter Recipe: मेथीचे पौष्टीक लाडू कसे तयार करायचे ?

कृती

स्टेप 1

एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, मिरच्या, आलं लसूण पेस्ट, जिरं, आणि चवी प्रमाणे मीठ टाकून एकत्र करून घ्या. आवश्यक तेवढे पाणी घालून मिश्रण तयार करून घ्या. (खूप पातळ करू नये). मिश्रण ५ मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्या. (यात तुम्ही आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या घालू शकता जसं किसलेले गाजर, कांद्याची पात, पालक इत्यादी).

हेही वाचा: Food Recipe : रोज पोळी खाऊन कंटाळा आलाय; हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी बनवा घरच्या घरी

स्टेप 2

गॅसवर एक तवा/पॅन ठेवा. गरम झाला की थोडं तेल लावून घ्या आणि पळीने मिश्रण गोल पसरून घावन घालून घ्या. बाजूने थोडे तेल सोडून २-३ मिनिटे झाकण द्या. आता दुसऱ्या बाजूने पालटून घ्या आणि२मिनिटांनी. काढून घ्या.

स्टेप 3

आपले गव्हाच्या पीठाचे घावने तयार आहेत. हे नुसते पण खूप छान लागतात. शक्यतो हे गरम गरमच खावेत.