Born In Nagpur Girija Oak Dotes On This Famous Nagpuri Dish Called Pudachi Vadi
sakal
Girija Oak Likes Nagpur's Famous Pudachi Vadi: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री गिरीजा ओक सध्या सर्व तरुणांची 'नॅशनल क्रश' बनली आहे. लल्लन टॉप या युट्युब चॅनलवर एका एपिसोडमध्ये घातलेल्या निळ्या साडीमुळे गिरीजा चर्चेत आहे. परंतु अनेकांना हे माहित नसेल की गिरीजा ओकचा जन्म नागपूरमध्ये झाला असून ती नागपूरच्या प्रसिद्ध पुडाच्या वडीच्या प्रेमात आहे. ही कुरकुरीत वडी चवीला अत्यंत उत्तम लागते आणि हिवाळ्यात मिळणारी ताजी कोथिंबीर वापरून तयार केली तर आरोग्यासाठी लाभदायक आहे. तुम्हाला ही वडी ट्राय करायची असेल तर पुढील दिलेली रेसिपी नक्की बनवून पाहा.