

Gond And Gajar Kheer Recipe:
Sakal
हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला उष्णता देणारे, पोषणमूल्यांनी भरपूर आणि चवीला अप्रतिम असे पदार्थ खाण्याची खास गरज असते. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे डिंक आणि गाजरची खीर होय. थंडीमध्ये डिंक शरीर गरम ठेवण्यास मदत करते, तसेच ताकद वाढवते. गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन A, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. या दोन्ही घटकांचा संगम म्हणजे एक पौष्टिक, स्वादिष्ट आणि घरच्याघरी सहज बनणारी खीर. डिंक आणि गाजरची खीर खास करून हिवाळ्यात बनवली जाते, कारण ती शरीराला उर्जा देते आणि थकवा कमी करते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही खीर पाहुण्यांसाठी किंवा सणासुदीच्या दिवशीही उत्तम पर्याय ठरते. चला तर मग जाणून घेऊया ही खीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.