
Gudi Padwa Special: गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी सगळे हिंदू बांधव घराच्या दारात, खिडकीत किंवा बाल्कनीत गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करतात. छान काठपदराची साडी, कडुनिंबाची आणि आंब्याची डहाळी बांधून त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा कलश उलटा ठेवतात. आणि सर्वांच्या आवडीचे म्हणजे साखरेच्या गाठीची माळही चढवली जाते. ज्यांचे गुढी पाडव्याच्या दिवशी विशेष महत्त्व असते. चला तर मग जाणून घेऊया या सगळ्यांच्याच आवडीच्या आणि विशेष साखरेच्या गाठी घरच्या घरी कश्या बनवायच्या.