
Healthy Breakfast Recipe:
Sakal
मुग डाळ दलिया हा पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्ता आहे.
जो प्रथिने, फायबर आणि खनिजांनी भरलेला आहे.
हा पदार्थ कोलेस्ट्रॉल कमी करतो, रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवतो आणि वजन नियंत्रणात मदत करतो.
दिवसाची सुरुवात करताना आरोग्यदायी आणि स्वादिष्ट नाश्ता करा. यामध्ये मुग डाळ दलिया हा उत्तम पर्याय आहे. हा साधा पण पौष्टिक पदार्थ प्रथिने, फायबर आणि खनिजांनी परिपूर्ण असतो, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसभर ऊर्जा मिळते आणि पचन सुधारते. मुग डाळ आणि दलियाचे हे संयोजन कोलेस्ट्रॉल कमी करते, रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, जे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत खूप महत्त्वाचे आहे.
ही रेसिपी तयार करणे सोपे आहे. फक्त 20 मिनिटांत बनते आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बनवता येतो. मुग डाळ दलिया बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.