

Healthy Breakfast Idea:
Sakal
सकाळचा नाश्ता नेहमी पौष्टिक, हलका आणि पटकन तयार होणारा असावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते. अशा वेळी मोड आलेल्या चण्यापासून बनवलेला डोसा हा उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. मोड आलेले चणे प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे शरीराला ऊर्जा देतात, पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि दिवसाची सुरुवात अधिक ताजेतवानेपणे होते. त्यातही या डोश्याची खासियत म्हणजे त्यासाठी फारशी तयारीची गरज नसते. फक्त रात्री चणे भिजवून सकाळी मिक्सरमध्ये काही मसाल्यांसह बारीक वाटायचे आणि तव्यावर कुरकुरीत डोसे तयार करून गरम सर्व्ह करायचे. हा डोसा चवीलाही उत्तम लागतो आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरतो. नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो चटणीसोबत सर्व्ह करु शकता. हा डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.