
Summer Delight For Kids Healthy Kulfi Bites: उन्हाळा आला की प्रत्येकाला गारवा देणाऱ्या पदार्थांची आठवण होते. उन्हाच्या कडाक्यामुळे शरीराला थंडावा मिळण्यासाठी आणि मनाला आनंद देण्यासाठी कुल्फी, आईसक्रिम, थंड पेये यांचा आस्वाद घेण्याचा मोह मुलांना तर अजिबात आवरता येत नाही. उन्हाळ्याची चाहूल लागली की अशा गोडसर, थंड पदार्थांची उत्सुकता लागून राहते. त्यातही कुल्फी हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ! पण साधारणतः कुल्फी गोडसर आणि साखरेने भरलेली असते. त्यामुळे मुलांना सारखेच पदार्थ देणे टाळायचा प्रत्येक पालकांचा प्रयत्न असतो. त्यासोबतच आपल्यालाही गोड पदार्थ खाण्याचा गिल्ट वाटतो.