

Beetroot Sprouts Dosa Recipe:
Sakal
how to make beetroot sprout dosa at home: सकाळचा नाश्ता पौष्टिक असणं जितकं महत्त्वाचं, तितकंच तो पटकन तयार होणंही गरजेचं असतं. आजकालच्या धावपळीच्या जीवनात पदार्थ बनवायाला जास्त वेळ नसतो. पण आरोग्यावर तडजोडही करायची नसते. अशावेळी तुम्हाला ऊर्जा, चव आणि हेल्थचा योग्य समतोल देणारा बीट स्प्राउट डोसा हा उत्तम पर्याय ठरतो. रंगाने आकर्षक, ताटात पाहताच भूक वाढवणारा आणि पोषणमूल्यांनी भरलेला हा डोसा फक्त काही मिनिटांत तयार होतो. बीटरूटमध्ये आयर्न, फायबर आणि अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतं, तर स्प्राउट्स तुमच्या नाश्त्याला प्रोटीनची जोड देतात. त्यामुळे हा डोसा मुलांच्या डब्यासाठी, ऑफिसला जाणाऱ्यांसाठी आणि वजन नियंत्रणासाठीही एकदम परफेक्ट. त्यातही तेल कमी लागत असल्याने हा उत्तम पदार्थ आहे. चला तर मग लगेच लिहून घ्या बीट स्प्राउट डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.