
सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन–ई, कॅल्शियम, खनिजे अशी अनेक पोषणद्रव्ये असतात. या व इतर महत्त्वाच्या स्रोतांमुळे रक्तदाब कमी होण्याबरोबरच हृदयरोग, कॅन्सर अशा आजारांपासून बचाव होतो.
आपण मागच्या लेखापासून ‘सुपर न्युट्रीशिअस फूड-‘सीडस’ अर्थात विविध प्रकारांच्या बियांविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, हे घटक पूर्वीपासूनच आपल्या आहारात आहेत. आजचा घटक म्हणजे ‘सूर्याफुलांच्या बिया’ देखील पूर्वीपासूनच आपल्या आहारात आहेत.
एक आजींनी मला सांगितल्याचे आठवते, ‘शेतावर जाताना वाटेत खाण्यासाठी त्या वट्यातून (पदराच्या ओटीतून) निखाऱ्यावर भाजलेल्या सूर्यफुलांच्या बिया घेऊन जात असत.’ माझ्या लहानपणीही आमची आजी आम्हाला मधल्या वेळेत निखाऱ्यावर भाजलेल्या सूर्यफूल किंवा भोपळ्याच्या बिया खायला द्यायची. सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन–ई, कॅल्शियम, खनिजे अशी अनेक पोषणद्रव्ये असतात. सूर्यफुलांच्या बियांमध्ये मॅग्नेशियमचा चांगला स्रोत असतो. या व इतर महत्त्वाच्या स्रोतांमुळे रक्तदाब कमी होण्याबरोबरच हृदयरोग, कॅन्सर अशा आजारांपासून बचाव होतो. रक्तातील साखर, कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठीही या बियांचे नियमित सेवन करणे फायदेशीर असते. सूर्यफुलांच्या बिया खाल्ल्याने मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी यासारखे त्रास कमी होतात. यातील ‘व्हिटॅमिन–ई’मुळे केस व त्वचेचे आरोग्य सुधारते. सूर्यफुलांच्या बिया सांध्यांना लवचिकता आणि मजबुती देतात. बियांच्या नियमित सेवनाने हाडे बळकट होतात.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पाहूयात सूर्यफुलांच्या बियांची पौष्टिक रेसिपी -
सूर्यफुलांच्या बियांची चटणी
साहित्य ः सूर्यफुलाच्या भाजलेल्या बियांचा कूट, धने पूड, मिरची पूड किंवा हिरवी मिरची, लसूण, सुक्या खोबऱ्याचा कीस, मीठ.
कृती ः
१. प्रथम बिया थोड्या वाटून घेणे.
२. नंतर उर्वरित सर्व साहित्य व बिया एकत्रित वाटणे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा