

Winter Special Healthy Bengali Shukto
sakal
Winter Special Healthy Bengali Shukto Recipe: थंड हवामानात शरीराला उष्णता आणि पोषण दोन्हीची गरज असते. त्यासाठी योग्या आहार घेणं गरजेचं असतं. आणि आपली भारतीय संस्कृती वर्षोनुवर्षं अनेक पारंपारिक हंगामी पदार्थांमुळे प्रसिद्ध आहे. आणि यालाच गरजेला न्याय देणारा पारंपरिक बंगाली पदार्थ म्हणजे शुक्तो.
वेगवेगळ्या भाज्यांची सौम्य चव, नारळ-दुधाची हलकी गोडी आणि सुगंधी मसाल्यांचा स्पर्श यामुळे हा पदार्थ पोटासाठी हलका, पण आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतो. तुम्हाला जर रोजच्या जेवणात वेगळेपणा हवा असेल आणि तरीही आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर बंगाली शुक्तो हा उत्तम पर्याय आहे.