एग्ज लव्हर आहात? मग घरीच तयार करा अंडा समोसा

घरच्या घरी तयार करा 'अंडा समोसा'
एग्ज लव्हर आहात? मग घरीच तयार करा अंडा समोसा

अनेक जणांना नॉनव्हेज पदार्थ फारसे आवडत नाहीत. मात्र, अंडी प्रचंड आवडतात. त्यामुळे असे एग लव्हर्स कायमच अंड्यापासून तयार केलेली रेसिपी किंवा पदार्थ शोधत असतात. अगदी बाहेर कुठे काही खायला गेले तरीदेखील हे लोक अंड्यापासून तयार केलेल्याच पदार्थांचा शोध घेत असतात. विशेष म्हणजे एग्ज लव्हर असलेल्यांसाठी एक भन्नाट पदार्थ सध्या आमच्या नजरेस पडला आहे. जो चटपटीत आणि खुसखुशीत तर आहेच. पण त्याचसोबत तो अंड्यांपासून तयार केलेला आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत घरीच कसा तयार करावा अंडा समोसा. (homemade-egg-samosa-recipe)

साहित्य -

३ उकडलेली अंडी

२ कच्ची अंडी

बारीक चिरलेला कांदा -१

बारीक चिरलेला टोमॅटो -१

हिरवी मिरची किंवा तिखट

हळद, मीठ- चवीनुसार.

कोथिंबीर.

तेल.

1 टेबलस्पून रेड मेयो सॉस

मैदा.

एग्ज लव्हर आहात? मग घरीच तयार करा अंडा समोसा
समुद्रात ब्रीज कसे उभारले जातात माहित आहे का?

कृती -

सर्वात आधी समोश्यासाठी लागणारं सारण पाहुयात.

एक कढई घेऊन त्यात प्रथम तेल गरम करुन घ्या. त्यानंतर या तेलात मिरची, कांदा आणि टोमॅटो क्रमाक्रमाने घाला व हे मिश्रण शिजेपर्यंत परतून घ्या. टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यात अंडी बारीक चिरुन घाला व सोबतच लाल तिखट मिक्स करा. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला. थोडा वेळ हे मिश्रण गॅसवर ठेवून एकजीव करा व नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

समोश्याचं आवरण करण्यासाठी

समोश्याचं कव्हर तयार करण्यासाठी प्रथम दरवेळेप्रमाणे ऑम्लेट तयार करुन घ्या. ऑम्लेट तयार करण्यासाठी एका वाटीत किंवा ग्लासात २ अंडी फोडून त्यात मीठ, हळद, लाल तिखट किंवा मिरची घालून नीट एकजीव करा. त्यानंतर तव्यावर किंचितसं तेल गरम करुन त्यात हे फेटलेलं अंड टाका व त्याची पोळी तयार करुन घ्या.

तयार झालेल्या ऑम्लेटपैकी एक भाग घेऊन त्याला समोश्यासारखा त्रिकोणी आकार द्या. त्यानंतर तयार केलेलं अंड्याचं सारण त्यात भरा. सारण भरल्यानंतर मेयो सॉसने या ऑम्लेटच्या कडा बंद करा. अशा प्रकारे एग्ज समोसा तयार. तसंच काही जणांना हा समोसा क्रिस्पी हवा असेल तर ओव्हन किंवा टोस्टरमध्ये काही वेळ ठेऊन तो गरमदेखील करता येऊ शकतो.

पद्धत दुसरी -

एग्ज समोसा तयार करण्यासाठी ऑम्लेटऐवजी मैद्यापासूनही आवरण तयार करता येऊ शकतं. यासाठी मैदा घेऊन त्यात तेलाचं मोहन, मीठ आणि चिमुटभर ओवा घाला. त्यानंतर या पीठाचा घट्टसर गोळा मळून घ्या. तयार कणकेचे लहान लहान गोळे करुन घ्या. या पैकी एक गोळा घेऊन त्याला त्रिकोणी आकार द्या. या त्रिकोणामध्ये तयार केलेलं अंड्याचं सारण भरुन मैद्याच्या पारीच्या कडा बंद करा. या कडा बंद करत असतांना पाण्याचा वापर करा. त्यानंतर गरम तेलात हे समोसे छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com