खमंग चवीचा चपाती मलिदा बनवताना 'या' खास घटकांचा वापर करताय?

खमंग चवीचा चपाती मलिदा बनवताना 'या' खास घटकांचा वापर करताय?
Summary

सोप्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी अजून चविष्ट आणि तितकीच पौष्टीक बनवू शकता.

बऱ्याचवेळा घरी काही कारणाने स्वयंपाकाचा अंदाज चुकतो. काहीवेळा घरातील एखाद्या सदस्याचे जेवण बनवलेले असते आणि आयत्यावेळी काही कारणाने तो जेवाणासाठी उपस्थितच राहत नाही. अशावेळी प्रत्येक आईची चिडचिड सुरु होते. केलेलं जेवण काय करु ? या प्रश्नाला अनेकजण सामोरे गेले असतील. मग अशावेळी फोनवरच याचं उत्तर 'उद्या माझ्यासाठी त्या बनवलेल्या चपातींचा मलिदा बनवून दे', असे असते. सर्रास घरांमध्ये ही परिस्थिती सारखीच असते. अशावेळी ठरल्याप्रमाणे आई दुसऱ्यादिवशी त्या शिल्लक चपातींचा मलिदा बनवते. मात्र बऱ्याचवेळी ही रेसिपी चुकते. कधीतरी साखर जास्त होते किंवा मग तूपाचे प्रमाण चुकते. मात्र सोप्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी अजून चविष्ट आणि तितकीच पौष्टीक बनवू शकता. या रेसिपीत मध्ये तुम्ही असे काही नवीन घटकही वापरु शकता. जे याची चव वाढवण्यास उपयोगी ठरतात. याची माहिती आपण आज पाहणार आहोत.

खमंग चवीचा चपाती मलिदा बनवताना 'या' खास घटकांचा वापर करताय?
घरच्या घरी बनवा Veg Keema Matar; येईल हाॅटेलसारखी चव

साहित्य -

  • शिल्लक चपाती - ४

  • तूप - आवश्यतेनुसार

  • साखर/गुळ - १ छोटी वाटी

  • चण्याची डाळ (जी चिवडा करताना वापरली जाते) - ४ चमचे

  • ओले खोबरे किसलेले - ४ चमचे

खमंग चवीचा चपाती मलिदा बनवताना 'या' खास घटकांचा वापर करताय?
रेसिपी : डिंक लाडू

कृती -

सुरुवातीला चपातींचे तुकडे करुन घ्या. ते मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करुन घ्या. लक्षात घ्या ते एकदम बारीक करायचे नाही. थोडे मोठे आणि भरडेच ठेवायचे आहेत. यानंतर हे बारीक केलेले चपातीचे मिश्रण बाजूला काढुन घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करुन घ्या. त्यात हे मिश्रण टाका. यात गूळ किंवा साखर घालून मिश्रण हलकेच परतवून घ्या. यानंतर यामध्ये चण्याची डाळ, किसलेले ओले खोबरे टाका. चण्याची डाळ मोठी मोठी वाटूनही तुम्ही यात घालू शकता. हे मिश्रण पुन्हा परतवून घ्या. यावर तुम्ही हवे असल्यास ड्रायफ्रुट्सचा वापर ही करु शकता. गरमा गरम खमंग चवीचा तुमचा चपाती मलिदा तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com