रात्री छोले भिजवायला विसरलात; Dont worry वापरा सोप्या ट्रिक्स

छोले रात्री भिजत न घालता दुसऱ्या दिवशी त्याची गरमागरम भाजी बनवू शकता
रात्री छोले भिजवायला विसरलात; Dont worry वापरा सोप्या ट्रिक्स

कोल्हापूर : गरमागरम छोलेचा स्वाद भटुरे सोबत घेणे हे सर्वांना आवडते. छोले बनवण्यासाठी त्यांना कमीत कमी आठ ते दहा तास भिजवावे लागते. (chole without soaking) पूर्णपणे पाण्यात भिजल्याशिवाय ते चविष्ट होत नाहीत. रात्रभर पाण्यात भिजलेली छोले शिजण्यासाठी सोयीचे होते. (erfect chole without soaking overnight) परंतु एखाद्या वेळेस जर तुम्ही छोले भिजत घालायला विसरलात तर आणि त्याच दिवशी छोलेची भाजी बनवायची किंवा खाण्याची चव आली असेल तर तुम्ही ते भिजत न घालताही भाजीची चव चाखू शकता. (easy tips to cook chole without soaking)जर तुमच्या घरी पाहुणे आले असतील आणि तुम्ही छोले भटूरे बनवणार असाल परंतु छोले भिजवलेले नसतील तर आम्ही तुम्हाला याविषयी एक ट्रीक सांगणार आहोत. ज्यामुळे छोले रात्री भिजत न घालता दुसऱ्या दिवशी त्याची गरमागरम भाजी बनवू शकता. (how to cook perfect chole without soaking)

बर्फ किंवा थंड पाण्याचा वापर

जर तुम्ही रात्री फुले भिजत घालणे विसरला असाल तर दुसर्‍या दिवशीसाठी दोन वाटी छोले कुकरमध्ये घाला आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी घाला. त्यानंतर कुकर गॅसवर ठेवून, दोन शेट्ट्या द्या. त्यानंतर कुकर गॅसवरून खाली उतरून स्टीम होण्यासाठी कुकरचे झाकण काढून ठेवा. त्यातील पाणी बाजूला करा त्यानंतर छोले पुन्हा कुकरमध्ये घाला. त्यात दोन ग्लास थंड पाणी आणि चार पाच बर्फाचे तुकडे टाका. कुकरचे झाकण बंद करा आणि ५ ते ८ मिनिटासाठी त्याला पुन्हा उकळून घ्या. त्यानंतर मंद आचेवर पुन्हा पाच मिळटे शिजू द्या. कुकर थंड झाल्यानंतर त्यातील छोले पहा. हे तुम्हाला शिजलेले दिसतील.

रात्री छोले भिजवायला विसरलात; Dont worry वापरा सोप्या ट्रिक्स
हिरवी मिरची स्टोअर करण्यासाठी काही सोप्या टिप्स

बेकिंग सोड्याचा वापर

तात्काळ छोले उकडून घेण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता. बेकिंग सोडा एक प्राकृतिक घटक आहे. जो छोले शिजवण्यासाठी वापरला जातो. दोन वाटी छोलेमध्ये चार ग्लास पाणी घालून कुकरमध्ये ठेवा. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून कुकर बंद करा. तीन शिट्ट्या देवून अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळा हे छोले शिजवून घ्या. थोड्या वेळाने कुकर बंद करा आणि थंड होऊ द्या. कुकर थंड झाल्यानंतर त्याचे झाकण बाजूला केल्यास शिजलेले छोले तुम्हाला दिसतील. उकळलेले छोले मसाला सोबत तुम्ही खाऊ शकता.

गरम पाण्याचा करा वापर

जर तुम्हाला एका तासाच्या आत छोले उकडून पाहिजे असतील तर सुरुवातीला एका पॅन मध्ये पाणी गरम करून घ्या आणि त्यामध्ये छोले मिक्स करा. गॅस मोठा ठेवून पाच मिनिटांपर्यंत उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करून ते झाकून ठेवा. त्यानंतर एक ते दोन तासानंतर हे छोले तुम्ही भाजीसाठी घेऊ शकता.

रात्री छोले भिजवायला विसरलात; Dont worry वापरा सोप्या ट्रिक्स
नखुरडे उठलेय? अशी घ्या काळजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com