esakal | Ashadhi Ekadashi Special : घरीच तयार करा उपवासाचा शिरा
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadhi Ekadashi Special :  घरीच तयार करा उपवासाचा शिरा

Ashadhi Ekadashi Special : घरीच तयार करा उपवासाचा शिरा

sakal_logo
By
शर्वरी जोशी

उपवास म्हटलं की दरवेळी फराळासाठी काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो. दरवेळी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे किंवा बटाट्यापासून तयार केले पदार्थ खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. त्यातच आता उद्या आषाढी एकादशी आहे. त्यामुळे उपवास हा आलाच. पण पुन्हा तेच साबुदाणा, शेंगदाणे यांच्यापासून तयार केलेले पदार्थ खाण्याचा कंटाळाला आला असेल तर वरई तांदुळापासून तयार केलेला शिरा नक्कीच ट्राय केला पाहिजे. म्हणूनच, आषाढी एकादशी स्पेशल शिरा कसा करावा ते पाहुयात. (how-to-cook-Upvas-Special-Va richa-Sheera-ssj93)

हेही वाचा: आता शिक्षणासोबत करा पार्ट टाइम जॉब!

साहित्य -

बारीक दळलेली भगर/ वरई - १ वाटी

साखर - १ वाटी

तूप - आवश्यकतेनुसार

केळी -१

सुकामेवा

वेलची पूड

तूप

केळी

दूध - गरजेनुसार (साधारणपणे ३०० मिली.)

मीठ - चिमुटभर

कृती -

प्रथम मिक्सरमध्ये भगर रवाळ दळून घ्या. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्या आणि चाळणीत निथळत ठेवा. एकीकडे दूध तापवत ठेवा. दूध तापत असताना दुसरीकडे कढईमध्ये २ चमचे तूप घालून त्यात भगर छान खरपूस भाजून घ्या. भगर लालसर रंग येईपर्यंत भाजल्यानंतर त्यात गरम दूध घाला. त्यानंतर मंद गॅसवर हे मिश्रण नीट एकजीव करा. सोबतच चिमुटभर मीठही घाला. दुधामध्ये भगर शिजत आली की त्यात आवडीनुसार सुकामेवा, वेलची पूड आणि साखर (साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी -जास्त करु शकता.) घाला. त्यानंतर केळीचे बारीक तुकडे करुन त्यात अॅड करा. तसंच कडेकडेने तूप सोडा. तयार होत असलेल्या शिऱ्याला एक वाफ द्या. अशा पद्धतीने आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा शिरा तयार.

loading image