esakal | खीरिचा बेत फसलाय? 'हा' महत्वाचा घटक वापरालाय का?
sakal

बोलून बातमी शोधा

खीरिचा बेत फसलाय? 'हा' महत्वाचा घटक वापरालाय का?

अजूनही एक असा घटक आहे ज्यामुळे ही खीर अधिक स्वादिष्ट आणि रुचकर लागते.

खीरिचा बेत फसलाय? 'हा' महत्वाचा घटक वापरालाय का?

sakal_logo
By
स्नेहल कदम

गणरायाचे आवडते पदार्थ म्हणजे खीर आणि उकडीचे मोदक होय. आज सकाळपासून गृहीनींची या पदार्थांच्या तयारीची लगबग सुरु आहे. कधीकधी गडबडीत या खीरीचा बेत फसू शकतो. चव बदलू शकते. (Ganesh Festival 2021) काहीजण गव्हाच्या या खीरीत साखरेचा वापरही करतात. परंतु त्यामुळे अस्सल चव मिळत नाही. काही ठिकणी गुळाचाही वापर केला जातो. (Ganesh Festival Special Dish) साधारणत: ग्रामीण भागात या खीरीमध्ये अस्सल सेंद्रिय कोल्हापूरी गुळाचा वापर होतो. याशिवाय अजूनही एक असा घटक आहे ज्यामुळे ही खीर अधिक स्वादिष्ट आणि रुचकर लागते. तो घटक म्हणजे करड्याचं बी. या बीयांचा वापर कसा वापरावा याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची खीर चविष्ट तर होतेच शिवाय तुमचे कौतुकही होऊ शकते. (wheat kheer receipe)

साहित्य -

  • खपली गहू - २०० ग्रॅम

  • गुळ - आवश्यकतेनुसार

  • बदाम

  • काजू

  • इतर ड्रायफ्रुट्स - आवश्यकतेनुसार

  • करड्याचं बी - ५० ग्रॅम

  • तुप - आवश्यकतेनुसार

  • ओले खोबरे

कृती - प्रथम आदल्या रात्री 'करड्याचं बी' पाण्यात भिजत टाका. दुसऱ्या दिवशी या भिजलेल्या बिया मिक्सरमध्ये वाटून त्याचे दुध काढून घ्या. गाळणीच्या सहय्याने ते मिश्रण एका भांड्यात गाळूण घ्या. यानंतर खपली गहू तासून ते शिजवून घ्या. शिजवताना त्यात थोडे पाणी आणि अगदी थोडेसे मीठ टाका. गहू शिजले की त्यात वरुन थोडे तुप टाका. यानंतर त्यात किसलेला कोल्हापूरी चवीचा गुळ टाका. तयार केलेल्या करड्याच्या बियांचे दुध घालून ते पुन्हा शिजवून घ्या. या तयार मिश्रणात वरुन काजू, बदाम, आणि तुम्हाला आवश्यक ते सर्व ड्रायफ्रुट्स टाका. यानंतर यात ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करुन टाका. काही काळ ही खीर तशीच शिजत ठेवा. आणि काही काळासाठी आठवत ठेवा. तुमची गरमा गरम खीर तयार आहे. तुम्ही दुधासोबत ही खीर सर्व्ह करु शकता.

loading image
go to top