Besan Paneer Sandwich : सकाळच्या नाश्त्याला बनवा हेल्दी अन् स्वादिष्ट बेसन पनीर सॅंडवीच, वाचा सोपी रेसिपी

Besan Paneer Sandwich : जर तुम्हाला नाश्त्याला काहीतरी वेगळे आणि टेस्टी ट्राय करायचे असेल तर बेसन पनीर सॅंडवीच हा उत्तम पर्याय आहे.
Besan Paneer Sandwich
Besan Paneer Sandwichesakal

Besan Paneer Sandwich : सकाळच्या नाश्त्यामध्ये खायला काय बनवावे? असा प्रश्न सगळ्यांना पडतो. बरं रोज खाल्ले जाणारे तेच पदार्थ जसे की, पोहे, उपमा, इडली, डोसा, शिरा हे नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे, सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खाण्याची इच्छा निर्माण होते.

जर तुम्हाला नाश्त्याला काहीतरी वेगळे आणि टेस्टी ट्राय करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीचे नाव आहे बेसन पनीर सॅंडवीच होय. चला तर मग जाणून घेऊयात बेसन पनीर सॅंडवीचची ही सोपी आणि हटके रेसिपी.

Besan Paneer Sandwich
Coffee Recipe : कॉफी आणि बरंच काही..! जाणून घ्या कॉफीचे भन्नाट प्रकार अन् रेसिपी

बेसन पनीर सॅंडवीच बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • बेसन – १ वाटी

  • पनीर – २०० ग्रॅम

  • ब्रेड स्लाईस

  • पाणी आवश्यकतेनुसार

  • बटर

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ टोमॅटो बारीक चिरलेला

  • १ शिमला मिरची बारीक चिरलेली

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

  • लाल तिखट १ चमचा

  • गरम मसाला अर्धा चमचा

  • तेल आवश्यकतेनुसार

बेसन पनीर सॅंडवीच बनवण्याची पद्धत खालीलप्रमाणे :

  • बेसन पनीर सॅंडवीच बनवण्यासाठी सर्वात आधी बेसनाचे मिश्रण तयार करून घ्या.

  • त्यासाठी, एका मोठ्या बाऊलमध्ये १ वाटीभर बेसनात थोडस पाणी मिसळा. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, टोमॅटो घाला. त्यानंतर, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला.

  • तुमचे बेसन पनीरचे सॅंडवीच स्टफिंग तयार आहे.

  • आता पॅन गरम करायला ठेवा त्यावर बटर पसरून घ्या.

  • त्यानंतर, ब्रेडचा स्लाईस बेसनाच्या मिश्रणात बुडवून घ्या आणि पॅनवर ठेवा.

  • बटर किंवा तेलामध्ये ब्रेड दोन्ही बाजूंनी शॅलोफ्राय करून घ्या. त्यानंतर, त्यावर पनीरचा स्लाईस ठेवून दुसरा ब्रेड ही त्याच पद्धतीने शॅलोफ्राय करून घ्या.

  • दोन्ही बाजूंनी मस्त बटर लावून घ्या. तुमचे गरमागरम बेसन पनीर सॅंडवीच खायला तयार आहे.

  • पुदिन्याची हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत हे सॅंडवीच खायला घ्या.

  • सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Besan Paneer Sandwich
Potato Bread Balls Recipe : नाश्त्याला बनवा टेस्टी अन् हेल्दी बटाटा ब्रेड बॉल्स, एकदम सोपी आहे रेसिपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com