Kanda Batata Poha : नाश्त्याला झटपट बनवा टेस्टी अन् हेल्दी कांदा बटाटा पोहे, वाचा सोपी रेसिपी

Kanda Batata Poha : सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी चवदार आणि हेल्दी खाण्याची सगळ्यांची इच्छा असते.
Kanda Batata Poha
Kanda Batata Poha esakal

Kanda Batata Poha : सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी चवदार आणि हेल्दी खाण्याची सगळ्यांची इच्छा असते. परंतु, सकाळी सगळ्यांनाच गडबड असते. त्यामुळे, या घाईगडबडीत बनवायला सोपा आणि खायला चवदार असणारा असा पदार्थ म्हणजे बटाटा पोहे होय. नेहमीचे पोहे खाण्यापेक्षा काहीतरी वेगळे ट्राय करण्यासाठी तुम्ही नाश्त्याला कांदा बटाटा पोहे बनवू शकता.

कांदा बटाटा पोहे बनवायला अतिशय सोपे असून ते खायला ही चवदार लागतात. शिवाय, सकाळच्या गडबडीत पटकन बनवून तयार होतात. चला तर मग जाणून घेऊयात कांदा बटाटा पोह्याची ही सोपी रेसिपी.

Kanda Batata Poha
Coffee Recipe : कॉफी आणि बरंच काही..! जाणून घ्या कॉफीचे भन्नाट प्रकार अन् रेसिपी

कांदा बटाटा पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • २ कप पोहे

  • बारीक चिरलेला कांदा – १

  • बारीक चिरलेला बटाटा १

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • कढीपत्ता

  • हळद चिमूटभर

  • जिरे-मोहरी अर्धा चमचा

  • तेल

  • शेंगदाणे

  • चवीनुसार मीठ

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • किसलेले खोबरे

  • लिंबाचा रस

कांदा बटाटा पोहे बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी पोहे चाळणीमध्ये चाळून २ वेळा धुवून बाजूला ठेवा.

  • त्यानंतर, गॅसवर कढई गरम करायला ठेवा.

  • या कढईत तेल घालून त्यात जिरे-मोहरी फोडणीला टाका.

  • त्यानंतर, कढीपत्ता फोडणीला टाका.

  • आता तेलात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची फोडणीला टाका.

  • कांदा, हिरवी मिरची परतल्यानंतर त्यात बटाटा घाला.

  • बटाटा परतल्यानंतर त्यात चिमूटभर हळद आणि शेंगदाणे घाला.

  • शेंगदाणे चांगले परतले की त्यात भिजवलेले पोहे घाला.

  • पोहे चांगले परतून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार मीठ, तेल घाला.

  • १० मिनिटे पोहे शिजल्यानंतर, गरमागरम खायला घ्या.

  • पोहे एका प्लेटमध्ये काढून त्यावर कोथिंबीर, किसलेले खोबरे आणि लिंबाचा रस घालून गरमागरम खायला घ्या.

Kanda Batata Poha
Potato Bread Balls Recipe : नाश्त्याला बनवा टेस्टी अन् हेल्दी बटाटा ब्रेड बॉल्स, एकदम सोपी आहे रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com