Healthy Makhana Kheer: मखाणा खीर बनेल आरोग्यदायी, फॉलो करा 'या' टिप्स

Healthy Makhana Kheer: मखाणा खीर आरोग्यदायी बनवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.
Makhana Kheer
Makhana KheerSakal

how to make makhana kheer healthier read tips

यंदा चैत्र नवरात्री ९ एप्रिलपासून सुरू झाली आहे. या दिवसांमध्ये अनेक लोक उपवास करतात. माता देवीची मनोभावे पुजा करतात. उपवासा दरम्यान पौष्टिक पदार्थ म्हणून मखाण्याने सेवन केले जाते. मखाणामध्ये सोडिअम, कोलेस्ट्रॉल, फॅट्स कमी असतात. यामुळे तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर मखाणा खाऊ शकता. मखाणा खीर आरोग्यदायी असली तरी त्यात कॅलरीज् आणि साखर असते. पण नवरात्रीत चवीशी तडजोड न करता मखाणा खीर आरोग्यदायी बनवू शकता.

  • नारळ, बदामचे दूध

मखाणा खीर आरोग्यदायी बनवण्यासाठी बदाम, नारळ किंवा ओट्सचे दूध वापरावे. या दूधामध्ये कॅलरीज् आणि फॅट्स कमी असतात. यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते. यामध्ये कॅलशिअम आणि व्हिटॅमिन डी असते.

  • साखर

अनेक लोक मखाणा खीरचा गोडवा वाढवण्यासाठी साखर वापरतात. पण आरोग्यदायी मखाणा खीर बनवण्यासाठी त्यात मध, गुळ, पाक किंवा सिरप मिक्स करून या खीरचा आस्वाद घेऊ शकता.

  • आरोग्यदायी मसाले

मखाना खीरच्या चवीसाठी फक्त साखर आणि इतर गोड पर्यायांवर अवलंबून न राहता, विलायची, दालचिनी किंवा जायफळ यांसारखे मसाले वापरून तुमची खीर चवदीर बनवू शकता. हे मसाले तुमच्या मखना खीरमध्ये फक्त चवच वाढवत नाहीत तर पचनसंस्था देखील चांगली ठेवते.

Makhana Kheer
Mango Ice Cubes: झटपट तयार होईल कैरीचे सरबत; आधीच 'असे' तयार करून ठेवा 'मँगो आईस क्युब'
  • सुकामेवा

मखाणा खीरमध्ये काजू, पिस्ता, बदाम यासारख्या आरोग्यदायी सुकामेव्याचा आहारात समावेश करू शकता. सुकामेकामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर थकवा जाणवत नाही.

  • फ्लेवर्सचा वापर

मखाणा खीरमध्ये अनेक फ्लेवर्सचा वापर करून चव द्विगुणित करू शकता. यासाठी मखाणा खीरमध्ये किसलेले नारळ, गुलाब किंवा व्हॅनिला इसेन्स टाकून खीर बनवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com