Rava Idli Recipe: आजच्या नाश्त्यात खा टेस्टी रवा इडली, पहा हटके अन् सोपी रेसिपी

इस्टंट रवा इडली रेसिपी जाणून घ्या
rava idli
rava idlisakal

दर दिवशी सकाळी नाश्त्याला काय करावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. नेहमी नेहमी एकच पोहे, उप्पीट खाऊन कंटाळा आला तर आपल्याला सहसा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. अशात इडली म्हटलं की वेळेवर कशी करणार, असा प्रश्न निर्माण होतो. पण आज आम्ही तुम्हाला इस्टंट बनणारी रवा इडली रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रवा इडली कशी बनवायची?

rava idli
Cucumber Idli: आता ब्रेकफास्टसाठी काकडी पासून बनवा झटपट इडली

साहित्य -

  • रवा

  • मोहरी

  • कढीपत्ता

  • आंबट दही

  • खाण्याचा सोडा

  • मीठ

  • तेल

rava idli
Diwali food : हे गोड पदार्थ करतील तुमचा दिवाळसण गोड

कृती

  • सुरवातीला गॅस वर तेल गरम करावे

  • गरम तेलात कढीपत्ता, मोहरी आणि रवा टाकावा.

  • रवा थोडा भाजून एका प्लेटमध्ये काढावा

  • हा रवा थोडा थंड झाल्यावर दहीत भिजवावा. त्यात मीठ टाकावं आणि एक-सव्वा तास मिश्रण झाकून बाजूला ठेवावं

  • त्यानंतर इडली पात्राला तेल लावावं

  • त्यानंतर वाटीभर तेल गरम करुन त्यात खाण्याचा सोडा टाकावा आणि रव्याच्या मिश्रणात एकत्र करावं

  • हे मिश्रण इडली पात्रांमध्ये टाकावं

  • इडली कुकरमध्ये १ ग्लास पानी टाकून उकळी घ्या

  • आणि त्यानंतर पात्र कुकूरमध्ये ठेवा झाकण लावून २० मिनीटे गॅसवर ठेवा

  • त्यानंतर गॅस बंद करा आणि पात्र थंड झालं की चाकूच्या साहाय्याने इडली काढा.

  • या इडली तुम्ही सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com