Oats Moongdal Tikki : नाश्त्याला बनवा ओट्स आणि मूगडाळीची टेस्टी आणि हेल्दी टिक्की, एकदम सोपी आहे रेसिपी

Oats Moongdal Tikki : तुम्ही ओट्स आणि मूगडाळीपासून टिक्की बनवू शकता. शिवाय, ही टिक्की टेस्टी आणि हेल्दी आहे.
Oats Moongdal Tikki
Oats Moongdal Tikkiesakal

Oats Moongdal Tikki : सकाळच्या नाश्त्यामध्ये खाण्यासाठी टिक्की हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. भारतात टिक्की खायला जवळपास सगळ्यांनाच आवडते. या टिक्कीचे असंख्य प्रकार आहेत. त्यातल्या त्यात आलू टिक्की ही सगळ्यांनाच माहित आहे. मात्र, अनेक जणांना हा पदार्थ नाश्त्यामध्या खावा की नाही, असा प्रश्न पडू शकतो.

परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की, तुम्ही ओट्स आणि मूगडाळीपासून टिक्की बनवू शकता. शिवाय, ही टिक्की खायला टेस्टी आणि हेल्दी आहे. त्यामुळे, आरोग्यासाठी फायदेशीर असणारा हा नाश्ता करायला सगळ्यांनाच आवडेल. यात काही शंका नाही. आज आम्ही तुम्हाला ओट्स आणि मूगडाळीची टिक्की कशी बनवायची? त्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणन घेऊयात ओट्स-मूगडाळ टिक्कीची सोपी रेसिपी.

Oats Moongdal Tikki
Rava Uttapam Recipe : नाश्त्याला बनवा गरमागरम चविष्ट रवा उत्तप्पम, दिवसभर राहील एनर्जी, एकदम सोपी आहे रेसिपी

ओट्स मूगडाळ टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • ताजे दही – ३ चमचे

  • मूगडाळ – अर्धा कप

  • रोल केलेले ओट्स – अर्धा कप

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • हिरव्या मिरच्या – २-३

  • चाट मसाला

  • लाल तिखट १ चमचा

  • गरम मसाला अर्धा चमचा

  • आले लूसण पेस्ट

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • तेल

  • चवीनुसार मीठ

ओट्स मूगडाळ टिक्की बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • ओट्स मूगडाळ टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी मूग डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर, त्यात १ कप पाणी मिसळून हे मिश्रण उकळून घ्या.

  • मूग डाळ मऊ शिजेपर्यंत हे मिश्रण चांगले उकळून द्या.

  • डाळ शिजल्यानंतर, थंड होण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घ्या.

  • त्यानंतर, डाळीतले पाणी काढून मिक्सरला डाळ बारीक करून घ्या.

  • आता या डाळीच्या मिश्रणात वरील सर्व साहित्य एकत्र करून मिसळा.

  • हे मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर यापासून टिक्की बनवा.

  • आता दुसऱ्या बाजूला गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा.

  • या तव्यावर थोडे तेल पसरून घ्या आणि तुम्ही तयार केलेल्या ओट्स मूगडाळीच्या टिक्क्या भाजून घ्या.

  • तुमची ओट्स मूगडाळ टिक्की तयार आहे.

  • हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.

Oats Moongdal Tikki
Beetroot Cutlet Recipe : नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी बीटरूट कटलेट, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com