Popti Party
Popti Partyesakal

पोपटी पार्टी घरी कशी कराल? 'या' टिप्स फॉलो करा|Popti Party At Home

अनेक ठिकाणी हिवाळ्यात पोपटी पार्टीचे बेत आखले जातात
Published on

थंडीचा (Winter) महिना आहे. या काळात भाज्या (Vegetables) खूप छान मिळतात. तसेच सिझनल भाज्याही मिळतात. ज्वारीचा हुरडा, हिरवी वांगी, पोपटी, पापडी, कोनफळं, लाल मिरच्या असे एकनाएक अनेक प्रकार खायला या काळात मजा येते. अनेक ठिकाणी हिवाळ्यात पोपटी पार्टीचे बेत आखले जातात. कोकणात अनेक ठिकाणी पोपटी पार्टीचे बेत रंगतात. पण सध्या कोरोना काळ आहे. रूग्णसंख्याही वाढते आहे. अशावेळी ही पार्टी कशी करणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण तुम्ही घरच्या गच्चीत किंवा अगदी घरातही अशी पार्टी करू शकता. करायला एकदम सोपा असा हा प्रकार आहे. शेफ तुषार प्रिती देशमुख यांनी याची रेसिपी सांगितली आहे. ती करून तुम्ही या विकेंड्सना घरीच पोपटी पार्टीचा प्लॅन करू शकता. (Popti Party At Home)

Popti Party
रितेश-जेनेलिया देशमुखचा डाएट प्लॅनिंग माहितीय का? तुम्हीही सहज करू शकता!

साहित्य : १ वाटी ओलं खोबरं, १/२ वाटी सुकं खोबरं, १/२ वाटी तुरीचे दाणे, ७ ते ८ छोटे बटाटे, १ वाटी उभे चिरलेले गाजराचे तुकडे, १/२ वाटी भुईमुगाचे दाणे, १/२ वाटी हरभरा, १ वाटी रताळ्याचे तुकडे, ३ काटेरी वांगी, २ ते ३ कणक कंद, १ वाटी कोनफळाचे तुकडे, १ वाटी शेवग्याच्या शेंगा, १/२ वाटी वाल पापडीचे दाणे, १ वाटी उभा चिरलेला कांदा, ४ चमचे चिंचेचा कोळ, आवडीप्रमाणे गुळ, १ चमचा जिरं, २ तुकडे दालचिनी, किंचित ओवा, ४ लवंगा, ४ ते ५ काळीमिरी, ४ ते ५ वेलची, १ चमचा बारीक चिरलेलं आलं, १ चमचा बारीक चिरलेला लसूण, १ जावित्री फूल, १ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, २ तमालपत्र, २ स्टार फूल, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना, तेल, जाड मीठ आणि मातीचं मडकं.

Popti Party
बाजरी, मेथीचं थालीपीठ कधी खालंय? जाणून घ्या 'हेल्दी' राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

कृती: प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, आलं, काळीमिरी, स्टार फूल, जावित्री फूल, वेलची, लवंग, दालचिनी, जिरं, ओवा, तमालपत्राचे तुकडे, ओलं खोबरं, सुकं खोबरं, चिंचेचा कोळ, गुळ, हळद, लाल तिखट, बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी घालून चांगलं परतून घ्या व मिश्रण एकजीव करा. मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये पाणी घालून जाडसर वाटून घ्या. तयार वाटण एका बाऊलमध्ये काढून त्यात सर्व भाज्या घालून चांगलं मॅरिनेट करा. नंतर मडक्यात थोडं तेल घालून ते आतील सर्व बाजूंना लागेल असं फिरवा. नंतर सर्व मॅरिनेट केलेल्या भाज्या केळीच्या पानात भरून मडक्यात टाका. मडक्यात वरून थोडा ओवा व पुदीन्याची पानं घालून पुन्हा त्यात केळीचं पान घाला. नंतर मडक्यात जाडसर मीठ पसरवा व १५ मिनिटं ठेऊन द्या. नंतर शेगडीवर मडकं उपडं ठेऊन २० ते ३० मिनिटं भाजून घ्या. पोपटी तयार.

हे लक्षात ठेवा- पोपटीसाठी लागणारा भांबुर्डीचा पाला शहरात मिळत नाही. त्यामुळे केळीचे पान वापरू शकता. अगदी गावरान नाही पण पोपटीची अस्सल चव तुम्हाला यामुळे नक्कीच घेता येईल.

Popti Party
फ्लॉवर खाण्याचे आहेत पाच फायदे माहिती आहेत का? हे वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com