रितेश-जेनेलिया देशमुखचा डाएट प्लॅनिंग माहितीय का? तुम्हीही सहज करू शकता!|Diet Food | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

plant base diet
रितेश-जेनेलिया देशमुखचा डाएट प्लॅनिंग माहितीय का? तुम्हीही सहज करू शकता!|Diet Food

रितेश-जेनेलिया देशमुखचा डाएट प्लॅनिंग माहितीय का? तुम्हीही सहज करू शकता!

रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख (Riteish- Genelia Deshmukh)त्यांच्या आहारात (Diet) कायम वनस्पतीजन्य पदार्थांचा (Plant Base Food)समावेश करतात. हे अन्नघटक अत्यंत पोषक असल्याने ते खाऊन तुमच्या शरीरात अनेक पोषकतत्वे जातात. वेगन डाएट आपलेसे करणारे लोकं या वनस्पतीजन्य पदार्थांचा आहार करण्याकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. वनस्पतीजन्य पदार्थ हे निरोगी पोषक तत्वांचे चांगले स्त्रोत आहेत.

यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि "फायटोन्यूट्रिएंट्स" सामाविष्ट असतात, मे 2021 मध्ये झालेल्या संशोधनात 500,000 पेक्षा जास्त लोकांवर 12 प्रकारचे अभ्यास केले गेले. जे गेल्या २५ वर्षांपासून अशा प्रकारचा आहार घेत आहेत. महत्वाचे म्हणजे, आपल्यासारखे सामान्य लोक रोजच्या आहारात जे पदार्थ खातात त्याचाच या डाएटमध्ये समावेश आहे. त्यामुळे हे पदार्थ खाताना खूप पैसेही खर्चही होणार नाही.

ritesh genelia

ritesh genelia

जे वनस्पतीजन्य आहाराचे सेवन करतात त्यांचा आरोग्याच्या कोणत्याही कारणाने मृत्यू होण्याची शक्यता कमी असल्याचे यावेळी आढळले. कोणत्याही किटकनाशकांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने केलेली ही अन्नप्रक्रिया असल्याने रितेश-जेनेलियासारखे अनेक लोक आता असे पदार्थ खाण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे तुम्हालाही सुरूवात करायची असेल तर या चार पदार्थांपासून करा. दर आठवड्याला तुम्ही हे पदार्थ खाल्ल्यास फायदा होऊ शकतो.

हेही वाचा: नुकतंच लग्न झालेल्यांनी 'हे' पदार्थ खाताना जरा सांभाळून

tomato

tomato

टोमॅटो (Tomato)

टोमॅटो हे बेरी फळ आहे . टोमॅटो व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीनने समृद्ध आहेत, कॅरोटीनॉइडमुळे त्याचा रंग लाल आणि चमकदार दिसतो. तो खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते. तसेच टोमॅटोपासून कोणताही पदार्थ खाल्ल्यास जसे भाजी, सूप, सॅलेड, सॉस तर प्रोटेस्ट कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, असेही संशोधनात सांगितले आहे.

हेही वाचा: फ्लॉवर खाण्याचे आहेत पाच फायदे माहिती आहेत का? हे वाचा

भोपळा

भोपळा

भोपळा ( Pumpkin)

भोपळा बीटा-कॅरोटीनने समृद्ध आहे, शरीरात व्हिटॅमिन ए हवे असेल तर भोपळा खाण्याने फायदा होते. संसर्गाशी लढा देण्यासाठी तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार हव्या असतील तर भोपळा हे काम करतो. डोळे, त्वचा, फुफ्फुसे आणि आतडे यांमधील पेशींची अखंडता राखण्यासाठी भोपळा खाण्याची गरज आहे.मे मध्ये झालेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, बीटा-कॅरोटीनने समृद्ध असलेले पदार्थ भोपळा, गाजर, रताळे आणि पालेभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदयरोग, पक्षाघात किंवा कोणत्याही कारणाने मृत्यू होण्याचा धोका 8 ते 9 टक्क्यांनी कमी असतो.

हेही वाचा: पाणी पुरी,भेळ खा! वजन घटवा

mushroom

mushroom

मशरूम (Mushrooms)

मशरूममध्ये भरपूर पोषकद्रव्ये तसेच अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. यामुळे तणाव थोड्याफाप प्रमाणात कमी होतो. अभ्यासात असे आढळले की, सर्वात जास्त मशरूम खाणाऱ्यांना न खाणाऱ्यांच्या तुलनेत कोणत्याही प्रकारचा कर्करोग होण्याचा धोका 34 टक्के कमी असतो. तसेच स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

हेही वाचा: काळं गाजर खाल्लय का? आहेत पाच फायदे Black Carrot Benefits

ओट्स

ओट्स

ओट्स (Oats)

ओट्स बीटा-ग्लुकनचे चांगले स्त्रोत आहेत, त्यातील फायबर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. रिफाईंड ग्रेन्सच्या तुलनेत ओट्स खाल्ल्याने रक्तातील साखर आणि इन्सुलिनच्या पातळीत लक्षणीय घट होते. महत्वाचे म्हणजे कमी प्रक्रिया केलेले ओट्स पचायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे संपूर्ण धान्याचे ओट्स, ज्याला ग्रॉट्स म्हणतात ते किंवा रोल केलेले ओट्स खाणे चांगले आहे. तसेच रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी ओट्स खाणे चांगले मानले जाते.

Web Title: Ritesh And Genelia Deshmukh Eat This Types Of Diet Food You Have To Try

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top