
फ्लॉवर खाण्याचे आहेत पाच फायदे माहिती आहेत का? हे वाचा
कुठल्याही सिझनमध्ये फ्लॉवर हमखास मिळतो. पण, थंडीच्या दिवसांत मात्र तो अतिशय चांगला आणि फ्रेश (Fresh) मिळतो. त्यामुळे या काळात फ्लॉवरच्या (Cauliflower) भाजीसह लोणचंही हमखास केलं जातं. अनेकांना तर फ्लॉवर आवडतही नाही. पण असे केल्याने आरोग्याला अपाय होऊ शकतो. कारण फ्लॉवर खाण्याचे अनेक फायदे आहेत.
फ्लॉवरमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट यांसह यासारखे पोषक घटक असतात. तसेच त्यात कॅलरीही कमी असते. "USDAच्या मते, मध्यम आकाराच्या फ्लॉवरमध्ये अंदाजे 146 कॅलरीज, 29 ग्रॅम कार्बन, 1.6 ग्रॅम फॅट, 12 ग्रॅम फायबर, 11 ग्रॅम साखर, 11 ग्रॅम प्रथिने आणि 176 मिलीग्राम सोडियम असते. या सगळ्याचा आपल्या शरीरावर खूप चांगला परिणाम होत असतो. तुम्ही जर दर आठवड्याला फ्लॉवर खाल्लात तर तुम्हाला पाच फायदे नक्की होतील. (Cauliflower Benefits for health)
हेही वाचा: Omicron Symptoms: अंगावर रॅशेस आलेत, सावधान... असू शकतं ओमिक्रॉनचं लक्षण!

Health
१) फायबर मिळेल - आरोग्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खाणे फायदेशीर आहे. नेहमी जो आहार खाता त्या तुलनेत फ्लॉवरमध्ये १० टक्के फायबर जास्त असते. तो खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह आदी विविध आजारांचा धोका कमी होतो. तसेच नियमितपणे फ्लॉवरचे सेवन केल्यास पचनास फायदा होतो.
२) कोलीनचा चांगला स्त्रोत- "कोलीन हे एक पोषक तत्व आहे. ते मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये आणि चयापचय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे फ्लॉवर खाल्ल्याने तुम्हाला पुरेशा प्रमाणात कोलीन मिळते. त्यामुळे तुमची विचारशक्ती चांगली राहते. बर्याच लोकांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असते. फ्लॉवरमध्ये या तत्वांचे प्रमाण 11 टक्के आहे. त्यामुळे फ्लॉवर खा सदृढ रहा.
३) रोगप्रतिकारक शक्ती वाढते- सध्या व्हिटॅमिन सी हा खूप चर्चेचा विषय झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेक पर्याय सांगितले जात आहे. फ्लॉवर हा त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे या काळात फ्लॉवर आवर्जून खावा. (Cauliflower Benefits for health)
हेही वाचा: अंजीर खा, वजन कमी करा

weight loss
४) व्हिटॅमिन केनी समृद्ध - फ्लॉवर हा चयापचय, रक्तातील कॅल्शियमची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि रक्त गोठण्यास महत्वाचा आहे, फ्लॉवरमध्ये २० टक्के व्हिटॅमिन के असते. त्यामुळे त्याचा आहारात समावेश केल्याने फायदाच होतो.
५) वजन कमी करण्यास मदत- फ्लॉवरमध्ये फक्त २५ टक्के कॅलरीज आहेत. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर फ्लॉवर खाणे मस्त पर्याय आहे. फुलकोबी खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. (Cauliflower Benefits for health)
हेही वाचा: प्राणायाम करताना या चूका टाळा! महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
Web Title: These Five Health Benefits Of Eating Cauliflower In Week
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..