Indian Food History : कसा प्रसिद्ध झाला म्हैसूर पाक, दाल बाटी अन् पेठा; काय आहे इतिहास!

वेगवेगळ्या समाजाप्रमाणे काही पदार्थ काही राज्यांचे प्रतिनिधित्व करतात.
Food
FoodSakal

आपल्या देशात जसे व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. त्याप्रमाणे वेगवेगळ्या संस्कृतीही आहेत. वेगळी संस्कृतीमध्येही वेगळी खाद्यसंस्कृती आहे आणि ती समाजाप्रमाणे बदलताना दिसते. वेगवेगळ्या समाजाप्रमाणे काही पदार्थ काही राज्यांचे प्रतिनिधित्व करतात. हे पदार्थ जितके पोट भरतात तेवढेच त्यांचा इतिहास वाचून तूमचे मन भरेल. आता तूम्ही खात असलेल्या काही पदार्थांचा इतिहास काय आहे ते पाहुयात.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

अनेकदा तूम्हालाही प्रश्न पडत असेल की, म्हैसूरचाच पाक का प्रसिद्ध आहे. दिल्लीचेच पेठे का प्रसिद्ध आहेत. इतर ठिकाणीही पेठे मिळतात पण लोकांना आग्र्याचे पेठे का आवडतात. दाल बाटी तर गुजरातमध्येही मिळते पण ती राजस्थानलाच जाऊन खाल्ली जाते, असे का?, अशाच काही प्रश्नांची उत्तरे आजच्या वृत्तात शोधण्याचा प्रयत्न करूयात.

आग्र्याचा पेठा

या पेठ्याचा जन्म मुघल साम्राज्याच्या काळात झाला. ताजमहालचे बांधकाम सुरू असताना हा पेठा पहिल्यांदा बनवण्यात आल्याचे सांगितले जाते. ताजमहाल सारखी भव्य वास्तू उभी करण्यासाठी हजारो कामगार रोज कष्ट करत होते. तेव्हा सुमारे 21,000 कामगारांना जेवण बनवणे मोठ्या कष्टाचे काम होते. ते रोज फक्त डाळ आणि भाकरी खात असत.

कामगारही रोज तेच साधे अन्न खाऊन कंटाळले असल्याचे बादशहा. सम्राट शाहजहाँनच्या लक्षात आले. तेव्हा ही गोष्ट बादशहाने उस्ताद इसा एफेंदी यांच्याकडे बोलून दाखवली होती. उस्तादांनी ही समस्या पीर नक्शबंदी साहेबांना सांगितली. त्यावर लवकरच तोडगा काढण्याची विनंती केली.

असे म्हणतात की एके दिवशी नमाज पठन करत असताना पीर नक्शबंदी साहेब बेशुद्ध पडले. ते शुद्धीत आले तेव्हा त्यांना देवाने पेठा बनवण्याची सूचना केली. त्यानंतर सुमारे ५०० स्वयंपाकींनी २१ हजार मजुरांसाठी पेठे बनवले.

जलेबी

जिलेबीचा उगम पश्चिम आशियातून झाला आहे. मध्ययुगीन काळात फारसी भाषिक आक्रमकांनी जिलेबी भारतात आणली. हिंदू धर्मग्रंथात मात्र याचा उल्लेख आहे. तिला संस्कृतमध्ये 'कुंडलिका' आणि 'जलवल्लिका' असे म्हणतात. आपला देशाचा स्वातंत्र्यदीनही जिलेबी खाऊनच साजरा करण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे.

दाल बाटी आणि चुरमा

दाल बाटी आणि चुरमा ही राजस्थानातील सर्वात लोकप्रिय डिश आहे. जयपूर, मेवाड, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर आणि उदयपूरमध्ये ही सर्वात जास्त खाल्ली जाणारा पदार्थ आहे. आज प्रत्येक राजस्थानी लोक या आवडीने खात असलेल्या या पदार्थाचा शोध मेवाडच्या चित्तौडगड किल्ल्यात लागला. मेवाडच्या राजपूतांना युद्धभूमीवर पोटात आधार असावा यासाठी पहिल्यांदा बनवण्यात आल्याचे सांगितले जाते. कारण, बाटी गव्हाचे पीठ आणि तुपापासून बनवली जाते. हे खाल्ल्याने पोट दिवसभर भरलेले राहते.

दम बिर्याणी

ज्या पदार्थाला जे नाव आहे त्याचे मूळ तिथेच सापडते. आता बिर्याणीला हैदराबादी बिर्याणीही म्हटले जाते. कारण बिर्याणीचा इतिहास याच राज्याच दडलेला आहे. बिर्याणीच्या निर्मीतीबद्दल अनेक कथा आहेत. परंतु अवधच्या बिर्याणीचा उगम लखनौमध्ये झाला आहे. अवधच्या नवाबाने आपल्या भागातील सर्व गरिबांसाठी अन्नधान्याची टंचाई असताना एका मोठ्या हंड्यामध्ये भात आणि सार एकत्र शिजवण्याचा आदेश दिला होता. स्वयंपाकाची ही कला 'दम' देणे म्हणून ओळखली जाऊ लागली.

म्हैसूर पाक

म्हैसूर पाक हे दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध गोड पदार्थ आहे. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला म्हैसूर पॅलेसच्या स्वयंपाकघरात त्याचा उगम झाला. कृष्णराजा वोडेयार यांचे राज्य होते. त्यांच्या राजवाड्यात काकासुर मडप्पा हे शाही स्वयंपाकी होते. ते राजाला प्रसन्न करण्यासाठी विविध पदार्थ तयार करून खाऊ घालत असत.

एके दिवशी त्यांनी बेसन, तूप आणि साखरेचा एक गोड पदार्थ बनवला. तो पगार्थ खाऊन राजा कृष्णराजा वोडेयार हे त्या पदार्थाच्या प्रेमातच पडले. डिशचे नाव विचारल्यावर, स्वयंपाकाने त्याचे नाव 'म्हैसूर पाक' ठेवले. त्यानंतर ते म्हैसूर पाक म्हणून ओळखले जाऊ लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com