Inspirational Story हातगाडीवाला बनला करोडपती, फळ विक्रेत्याचा बिझनेसमन बनण्याचा यशस्वी प्रवास

रांचीमधील चंदन कुमार चौरसिया आपल्या वडिलांसोबत एकेकाळी हातगाडीवर फळांची विक्री करत असत. मात्र जिद्द, मेहनत आणि चिकाटीने त्यांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायाला वेगळं स्वरुप देण्याचा निर्णय घेतला आणि आज ते एक फळांचे यशस्वी व्यापारी आहेत
Business Success Story
Business Success StoryEsakal

Business Success Story: यशाचं शिखर गाठण्यासाठी आणि आपली स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत आणि जिद्द गरजेची आहे. जर तुमच्याकडे जीवतोड मेहनत करण्याची इच्छा आहे आणि प्रत्येक संकटांवर मात करण्याची जिद्द आहे तर यश नक्कीच तुमच्या पाठीशी उभं राहील. Inspirational Story of Ranchi Man Chandan Kumar Chourasiya fruit vendor to businessman

अशीच ही एक प्रेरणादायी कहाणी Inspiring Story आहे. रांचीच्या एका फळ विक्रेत्याची. रांचीमधील चंदन कुमार चौरसिया आपल्या वडिलांसोबत एकेकाळी हातगाडीवर फळांची विक्री करत असत. मात्र जिद्द, मेहनत आणि चिकाटीने त्यांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायाला वेगळं स्वरुप देण्याचा निर्णय घेतला आणि आज ते एक फळांचे Fruits यशस्वी व्यापारी आहेत.

चंदन कुमार यांचे वडिल हातगाडीवर दारोदारी जाऊन फळांची विक्री करत. त्यांच्यासोबत अनेकदा चंदन कुमारही जात. वडिल घेत असलेले प्रचंड कष्ट त्यांनी पाहिले होते. एकेदिवशी वडिलांचा व्यवसाय वाढवायचा असं त्यांनी ठरवलं होतं.

मुद्रा योजनेतून घेतलं कर्ज

चौरसिया यांनी स्वत:चं दुकान खरेदी करायचं असं स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या ३५व्या वर्षी जेव्हा चंदन कुमार चौरसिया यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्याकडे पैशांची मोठी तंगी होती. पैसा नसतानाही त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय पक्का केला होता.

सोशल मीडियाच्या मदतीने चंदन यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची संपूर्ण माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये कर्जासाठी अर्ज केला. संपूर्ण माहिती मिळवल्याने त्यांना कर्ज घेणं Loan सोप गेलं. पहिलीच वेळ असल्याने बँकेने चंदन यांनी ५० हजार रुपयांचं कर्ज दिलं.

हे देखिल वाचा-

Business Success Story
Inspirational Story : ओल्या नारळाच्या करंजांनी पोचवले चैत्रालीताईंना सातासमुद्रापार

व्यवसायात जम बसू लागला

चंदन यांनी मेहनत करून फळांचं दुकान थाटलं. हळूहळू फळ विक्रीतून त्यांना चांगला नफा मिळू लागला. पैसे हातात आल्यानंतर लगेचच त्यांनी बँकेचं कर्ज फेडलं आणि उरलेले पैसे पुन्हा व्यापारातच गुंतवले. वेळेपूर्वीच कर्ज फेडल्याने बँकेने चंदन यांना पुन्हा अडीच लाखांचं कर्ज दिलं

इतर राज्यातून फळं मागवून विक्री

चंदनना बँकेकडून पुन्हा कर्ज मिळाल्याने त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. व्यवसाय अधिक वाढवण्यचा त्यांनी निर्णय घेतला. फळ मार्केटमध्ये आपल्या दुकानाची खासियत निर्माण करण्यासाठी त्यांनी स्थानिक मार्केटएवजी इतर राज्यातील बाजांपेठांशी संपर्क वाढवला.

इतर राज्यातून फळं मागवून ते रांचीमध्ये या फळांची विक्री करू लागले. यामुळे मार्केटमध्ये त्यांच्या दुकानाची वेगळी ओळख निर्माण झाली. अनेक लोक त्यांच्या दुकानातून फळं विक्री करू लागले.

वडील आणि भावाला केलं व्यवसायात सहभागी

चंदन यांनी व्यवसायातून नफा मिळू लागल्यानंतर सर्व प्रथम आपल्या वडीलांना आराम देण्याचं ठरवलं. हातीगाडीवर फळांची विक्री करण्याएवजी ते दुकानात देखरेख करण्यासाठी बसू लागले. तर भावालाही नोकरी मिळत नसल्याने त्यांनी त्याला व्यवसायात सहभागी करून घेतलं.

कर्जाची वेळोवेळी परतफेड

चंदन यांनी व्यवसायाची वृद्धी करत असतानाच वेळोवेळी कर्जाची परतफेड केली. चांगला पैसा येऊ लागताच हुरळून न जाता त्यांनी वेळोवेळी कर्जाची परफेड केली. अडीच लाखांचं दुसरं कर्ज देखील वेळेपूर्वीच फेडल्याने बँकेने पुन्हा त्यांना अडीच लाखांचं कर्ज दिलं. ज्यामुळे चंदन यांना फळांचा व्यवसास वाढवणं शक्य झालं.

कुटुंबाची परिस्थिती सुधारली

चंदन यांनी हिमत्तीने कर्ज घेऊन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती आज चांगली झाली आहे. एकेकाळी पैशांची तडजोड करणारं कुटुंब आज सुखात जीवन जगत आहेत.

व्यवसाय करण्याची इच्छा असूनही अनेकजण पैशांच्या अभावी किंवा स्पर्धेच्या भितीने व्यवसायात उतरत नाहीत. अशांसाठी चंदन यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. व्यवसाय करण्यासाठी पैशांएवजी जिद्द आणि चिकाटी गरजेची असल्याचं त्यांनी सिद्ध केलंय.

हे देखिल वाचा-

Business Success Story
Inspirational Story : घरीच अभ्यास करत IITची स्वप्नपूर्ती!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com