
Cooking Tips for Breakfast : असा बनवाल पराठा तर पीठ संपेल पण मन भरणार नाही!
Achari Paratha Recipe: बहुतेक घरांमध्ये नाश्ताच्या वेळी पराठे केले जातात. मुळात पराठे बनवायला सोपे अन् पोटभर होतात, हे बटाटा, कोबी, कांदा यांना स्टफ करुन आपण बनवू शकतो. त्याचबरोबर काहीजण टिफिनमध्येही पराठे नेणं पसंत करतात. पण स्टफ पराठे म्हटले तर ते जरा वेळ खाऊ असतात कारण वेगळं सारण तयार करा, कणिक भिजवा खूप मोठी प्रोसेस असते.
जर एखाद्या दिवशी वेळ कमी असेल तर तुम्ही साध्या पराठ्यात लोणच्याचा मसाला घालून चविष्ट आचारी पराठा बनवू शकतात. साध्या पराठ्यात लोणच्याचा मसाला कसा मिसळायचा ते बघूया...
टेस्टी पराठा कसा बनवायचा
- साध्या पराठ्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही पीठ मळतांना त्या लोणच्याचा मसाला टाकू शकतात.
- एका भांड्यात पीठ घ्या आणि नंतर त्यात घरात असलेले लोणच्याचा मसाले त्यात टाका.
- त्यात आवडीनुसार तीळ आणि बडीशेप टाका.
- सामान्य पिठाप्रमाणेच पीठ मळून घ्या आणि त्याचे पराठे तयार करा.
- आचारी पराठा बनवण्यासाठी काही लोक सुक्या मसाल्याचा सुद्धा वापर करतात.
लोणच्याचा मसाला नसेल तर?
जर तुमच्याकडे लोणच्याचा मसाला नसेल किंवा तुम्ही आधीच कणिक भिजवून ठेवलेली असेल तर तुम्ही लोणच्याचे तेलदेखील वापरु शकतात. यासाठी सामान्य पद्धतीने पराठा बनवून लोणच्याच्या तेलाने भाजून घ्या.